शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 00:13 IST

Sonam Wangchuk Arrest Updates: आदिवासी या नात्याने तुम्ही लडाखच्या लोकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकता, असेही पत्रात लिहिले आहे.

Sonam Wangchuk Arrest Updates : सध्या चर्चेत असलेले सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सोनम वांगचुक यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यांनी एनएसए अंतर्गत पतीची अटक नियमबाह्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांची बिनशर्त सुटका करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे. त्यांनी या पत्राची प्रत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठवली आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात गीतांजली यांनी नमूद केले आहे की, आदिवासी म्हणून तुम्ही लडाखच्या लोकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकता. २४ सप्टेंबर रोजी लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराशी सोनम यांचा कसलाही संबंध नव्हता. त्यामुळे त्यांची सुटका करावी.

त्या पुढे लिहितात की, सोनम यांनी स्वतः हिंसाचाराचा निषेध केला होता. सरकारवर कडक कारवाईचा आरोप करत गीतांजली म्हणाल्या की, गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकार लडाख चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. गीतांजली यांनी एफसीआरए परवाने रद्द करणे आणि पाकिस्तानी संबंध यासारखे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. सोनम यांच्यावर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो जोधपूर तुरुंगात आहे. तरी त्यांची बिनशर्त सुटका करावी, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.

गीतांजली यांनी असाही दावा केला आहे की, लेहमध्ये माध्यमांशी बोलण्याचा त्यांचा प्रयत्न रोखला जात असल्याने त्यांना देशासमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी दिल्लीला यावे लागणार आहे. लेहमध्ये कर्फ्यू आहे आणि इंटरनेट बंद आहे. आम्ही काम करू शकत नाही किंवा माध्यमांशी बोलू शकत नाही. माध्यम कर्मचाऱ्यांना आमच्या संस्थेत, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख (HIAL) देखील प्रवेश दिला जात नाहीये. जेव्हा काही पत्रकार आले, तेव्हा CRPF कर्मचाऱ्यांनी त्यांचा कॅम्पसमध्ये पाठलाग केला. परिस्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे. आम्हाला अद्याप वांगचुक यांच्या अटकेच्या आदेशाची प्रत देण्यात आलेली नाही आणि स्थानिक अधिकारी फोन कॉल्सही उचलत नाहीत. त्यांच्या प्रकृतीबद्दल मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Release my husband unconditionally: Sonam Wangchuk's wife writes to President.

Web Summary : Gitanjali Angmo, wife of Sonam Wangchuk, urges President Murmu to release her husband, claiming his arrest under NSA is unlawful. She highlights his condemnation of violence and accuses the government of weakening the Ladakh movement. She also claims they are being denied media access.
टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूladakhलडाख