शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सोमनाथ यांचे वर्तन लज्जास्पद, त्यांनी समर्पण करावे - केजरीवाल

By admin | Updated: September 23, 2015 11:07 IST

सोमनाथ भारती यांचे वागणे पक्ष व कुटुंबासाठी लज्जास्पद असून त्यांनी पोलिसांपासून लांब न पळता समर्पण करून त्यांना सहकार्य करावे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अटकेच्या भीतीने लांब पळणारे 'आप'चे आमदार व माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांसमोर समर्पण करावे, असा सल्ला 'आप'चे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ' सोमनाथ यांनी पोलिसांसमोर समर्पण केले पाहिजे. ते लांब का पळत आहेत? जेलमध्ये जाण्याची त्यांना एवढी भीती का वाटत आहे? आता त्यांचे वागणे पक्ष व कुटुंबांसाठी लज्जास्पद ठरत आहे. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे' असे ट्विट करत केजरीवाल यांनी सोमनाथ भारतींना फटकारले आहे.
'आप'चे आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी लिपिका मित्रा हिने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. याप्रकरणी  त्यानंतर पोलिसांनी भारती यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाण, फसवणूकीसह अनेक गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल होताच भारती यांनी दिल्ली कनिष्ठ न्यायालयात धाव घेत अटक टाळण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत भारतींविरोधात अटक वॉरंट काढले होते. या निर्णयाला भारती यांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले, त्यावर आज झालेल्यासुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही आधीचा निर्णय कायम ठेवत भारतींना दिलासा देण्यास नकार दिला.  त्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांचा शोधही सुरू केला, मात्र ते त्यांच्या निवासस्थानी असल्याने काल त्यांना अटक करता आली नाही.