शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या काही सुधारणा मान्य

By admin | Updated: March 9, 2015 23:39 IST

भूसंपादन सुधारित विधेयक शेतकरीविरोधी असून भांडवलवाद्यांच्या फायद्यासाठी शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न झाल्यास देशात

नवी दिल्ली : भूसंपादन सुधारित विधेयक शेतकरीविरोधी असून भांडवलवाद्यांच्या फायद्यासाठी शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न झाल्यास देशात नक्षलवादाची समस्या पुन्हा डोके वर काढेल, असा इशारा विरोधकांनी मोदी सरकारला दिला आहे. विरोधकांनी सुचविलेल्या काही सुधारणा विधेयकात स्वीकारल्या जातील, असे संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी लोकसभेत चर्चेत हस्तक्षेप करताना स्पष्ट केले.भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्व्यवस्थापनात उचित प्रतिकार आणि पारदर्शकता अधिकार तसेच योग्य मोबदला (सुधारित) विधेयक २०१५ वरील वादळी चर्चेत हस्तक्षेप करताना नायडू म्हणाले की, विरोधकांकडून या विधेयकात एकूण ५२ सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. सरकार त्यावर विचार करेल. चांगल्या सूचना विधेयकात समाविष्ट केल्या जातील.विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केवळ भांडवलवाद्यांना थेट लाभ पोहोचविण्याच्या मुख्य उद्देशातूनच हे विधेयक आणण्यात आल्याचा आरोप केला. त्याच वेळी रस्त्यावर उतरून संसदेपर्यंत आवाज उठविणार असल्याचा इशाराही दिला. चर्चेला सुरुवात करताना भाकपचे सी.एन. जयदेवन म्हणाले की, या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर सरकार गरिबांच्या जमिनी बळजबरीने हडपणार आहे. या विधेयकात अनेक त्रुटी असून सरकारच्या उद्देशाबाबत शंका निर्माण होते. सुधारित वटहुकूम आणण्यामागे सरकारने एवढी घाई का चालविली आहे, असा सवालही त्यांनी केला.मोदी सरकारने विकासाच्या राजकारणावरच भर दिला आहे. या सुधारित विधेयकामुळे संरक्षण, रेल्वे, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी जमीन उपलब्ध होऊ शकेल. पायाभूत संरचना व्यवस्थित करण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे, असे भाजपचे कीर्ती आझाद यांनी स्पष्ट केले. ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा देणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)