शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सोशल मीडियावरील खाते आधारशी जोडा, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 5:23 PM

नवी दिल्ली : फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून घडणारे गुन्हे रोखण्यासाठी सोशल मीडियावरील खाते आधार कार्ड , पॅन कार्ड किंवा मतदार ...

नवी दिल्ली : फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून घडणारे गुन्हे रोखण्यासाठी सोशल मीडियावरील खाते आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्राशी जोडावे, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात ‘फेक न्यूज’ पसरविण्यासाठी सोशल मीडियावरील अशा अकाऊंट्सचा वापर केला जातो, असे याचिकेत म्हटले आहे.भाजप नेते अ‍ॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. विशेषत: आचारसंहिता लागू असताना फेक व पेड न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी ही उपाययोजना आवश्यक असल्याचे उपाध्याय यांनी म्हटले आहे. सोशल मिडीया अकाऊंट्सशी ओळखपत्र जोडल्यास सायबर क्राईम करणा-यांवर वचक शक्य आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.भारतीय दंड संहिता, लोकप्रतिनिधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत हा बदल करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावे, अशी विनंती अ‍ॅड. उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली होती. मात्र त्याचवेळी उच्च न्यायालयात जाण्याची मुभाही याचिकाकर्त्याला दिली होती. याशिवाय सोशल मीडियावर अकाऊंट््स आधार कार्डशी जोडण्याची मागणी करणा-या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच विविध उच्च न्यायालयांकडे वळत्या केल्या आहेत. फेसबूक आणि  ट्विटरचे खाते आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावे, असे उपाध्याय यांनी म्हटले आहे.ट्विटरवरील साडेतीन कोटी अकाऊंट्सपैकी दहा टक्के बनावट खाते आहेत. यातील मंत्री, उद्योजक, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या नावांनी शेकडो खात्यांचा समावेश आहे. फेसबूकवरील लाखो खाते सेलिब्रिटींची छायाचित्रे वापरून जातीय तेढ निर्माण करतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाAdhar Cardआधार कार्डCourtन्यायालय