सिंगल...

By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30

दारुबंदीची मागणी

Single ... | सिंगल...

सिंगल...

रुबंदीची मागणी
अहमदनगर : तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील शाळेच्या शेजारी दारुची दुकाने आहेत. या दुकानामुळे शाळेतील मुलांवर विपरीत परिणाम होतो. दारु पिणारे लोकांना शिवीगाळ करतात. त्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली आहे. मंदिराशेजारीच दारुचे दुकान असल्याने त्याचा भाविकांनाही त्रास होतो. १४ ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी दारुबंदीचा ठराव केला आहे. दारुबंदीच्या अंमलबजावणीबाबत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास ग्रामस्थ उपोषण करणार आहेत, असे अर्जुन खराडे, किरण भापकर, रोहिदास कुलाजे, जयदत्त नन्नवरे आदींनी निवेदनात म्हटले आहे.
-----------
कमल जाधव यांची निवड
अहमदनगर: राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगरच्या महिला जिल्हाध्यक्षपदी कमल वसंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. पक्षाचे राज्य सचिव कैलास कोळसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
------------
स्वकुळ साळी मंच
अहमदनगर : स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळ आणि महिला मंच यांच्यातर्फे भगवान जिव्हेश्वर जयंतीनिमित्त २२ व २३ ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम बागडपट्टी येथील श्री. जिव्हेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहेत.
-----------

Web Title: Single ...