शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२४,८९० वाहनचालकांनी तोडले सिग्नल

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

- खासगी व एसटी बसही आघाडीवर : दक्षिण वाहतूक शाखेत सर्वात जास्त प्रकरणे

- खासगी व एसटी बसही आघाडीवर : दक्षिण वाहतूक शाखेत सर्वात जास्त प्रकरणे
नागपूर : उपराजधानीच्या चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा, ही प्रवृत्ती वाढत आहे. १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत २४,८९० वाहनधारकांनी सिग्नल तोडले. वाहतूक शाखेच्या सहा झोनमधून दक्षिण झोनमध्ये याची सर्वात जास्त प्रकरणे दाखल करण्यात आली. सिग्नल तोडणाऱ्यांमध्ये खासगी व एसटी बसही मागे नाहीत. गेल्या पाच वर्षांत ६८४ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७२ हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्यानेच याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षात पूर्व वाहतूक शाखेंतर्गत ५६४२ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. यांच्याकडून ५,२४,४०० रुपये वसूल करण्यात आले. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गंत ८२०४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले तर यांच्याकडून ८,९५,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पश्चिम वाहतूक शाखेंतर्गत ५०३७ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून ७,९१,५०० रुपये वसूल करण्यात आले. एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गंत २३९४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून २,४१,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत २३८९ वाहनचालकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून २,२१,२०० रुपये वसूल करण्यात आले. तर उत्तर वाहतूक शाखेंतर्गंत सर्वात कमी म्हणजे १२२४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून १,२०,३०० रुपये वसूल करण्यात आले.
वाहतूक सिग्नल तोडण्यात खासगी व एसटी बसही मागे नाहीत. गेल्या पाच वर्षांत सर्वात जास्त पश्चिम वाहतूक शाखेंतर्गंत येणाऱ्या वाहतूक सिग्नलवरील या बसचालकांकडून सिग्नल तोडण्यात आले. याची संख्या २५४ आहे. त्यानंतर पूर्व वाहतूक शाखेंतर्गंत २१४ बसचालकांनी सिग्नल तोडले. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गंत १६४, इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत ४८ तर एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गत फक्त ४ बसचालकांनी सिग्नल तोडले. एकूण ७२,१०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, उत्तर वाहतूक शाखेंतर्गत बसचालकांकडून एकही सिग्नल तोडले नसल्याची नोंद आहे.