शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 7:59 PM

शुजात यांच्या हत्येमागे पाकिस्तानचं मोठं कारस्थान असण्याची शक्यता

श्रीनगर: पत्रकार शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. बुखारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीनजणांची ओळख पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील दोघे दक्षिण काश्मीरचे असून एकजण पाकिस्तानचा आहे. या हल्ल्यासंदर्भात नावेद जट्ट याचं नावदेखील समोर आलं आहे. जट्ट हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुजात यांच्या हत्येमागे पाकिस्तानचं मोठं कारस्थान असण्याची शक्यता आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून याची पडताळणी सुरू आहे. या हत्याकांडात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तर एसआयटी आणि तपास यंत्रणांकडून तिघांचा शोध सुरू आहे. शुजात यांच्या हत्येच्या कटात एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा सहभाग असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. मात्र जम्मू-काश्मीर पोलीस किंवा इतर कोणत्याही तपास यंत्रणांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असावा, अशी शक्यता लेफ्टनंट जनरल ए. के. भट्ट यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवली होती. काश्मीर खोऱ्यातील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना भट्ट यांनी हा अंदाज व्यक्त केला होता. यानंतर हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर हल्ल्याचा तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. याची जबाबदारी श्रीनगरच्या पोलीस उपमहानिरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी