शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात नागपूर

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

धनगर युवक मंडळ

धनगर युवक मंडळ
नागपूर : स्वाती लॉन, मानेवाडा रोड येथे धनगर युवक मंडळातर्फे विदर्भस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन माजी आ. प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षपदी आ. रामहरी रूपनवार होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. राम शिंदे, आ. रामराव वडकुते, माजी आ. हरिभाऊ भदे, दिलीप ऐडतकर, प्रभाकर लोंढे, अमित ठमके, पुरुषोत्तम डाखोळे, सुभाष ढवळे, हरिभाऊ कानडे, रमेश ढवळे, रामदास पाटील, डॉ. सहावे उपस्थित होते. अण्णा शेंडगे म्हणाले, आरक्षणाबाबत आतापर्यंत विधानसभेत आपण सर्वाधिक प्रश्न विचारले, त्यावर कार्यवाही होते आहे. याप्रंसगी २९ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वधू-वरांनी मेळाव्यात आपला परिचय करून दिला. याप्रसंगी सर्वच अतिथींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शुभा टेकाडे तर आभार गणेश पावडे यांनी मानले.
---------------------
मराठा विद्या प्रसारक समाज
मराठा विद्या प्रसारक समाजतर्फे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून महिला मेळावा व स्वयंरोजगार प्रदर्शनाचे आयोजन सक्करदरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहात करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन समाजसेवी डॉ. उज्वला देशमुख, यशोधराराजे भोसले, हर्षलाताई साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवीदास किरपाने, नरेंद्र मोहिते, भाऊसाहेब सुर्वे, संगिता शिंदे उपस्थित होते. संचालन प्रेमलता जाधव यांनी केले. याप्रसंगी नऊवारी फॅशन शो, नृत्य स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नरेंद्र मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केले. रोहिणी भोसले आणि सीमा भोसले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशी किरपाने, दीपाली मोहिते, सीमा शिर्के, रेखा सुर्वे, मनीषा मोहिते, आशा जगताप, सीमा सुरुषे, लता आंभोरे, पुष्पा शिंदे, सुचिता चव्हाण, मृणाल जाचक, सुरेखा घोरपडे, कुमुदिनी जाधव, रंजिता चव्हाण, रेवती जाधव, विभा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.