अल्पवयीन बटुकांच्या कथित लैंगिक शोषणासंदर्भातील आरोपात अडकलेल्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पोलिसांकडून करण्यात आलेल्या वैद्यकीय तपास अहवालात दोन्ही पीडित अल्पवयीन मुलांसोबत अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी संबंधित दोन्ही मुलांची बुधवारी वैद्यकीय तपासणी केली. एवढेच नाही तर, तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनीही, अहवालात लैंगिक अत्याचाराचे संकेत स्पष्टपणे नोंदवण्यात आले असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यानंतर, पोलिसांनीही तपासाचा वेग अधिक केला आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या माहिती नुसार वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा पुरावा म्हणून केस डायरीमध्ये समाविष्ट केला जात आहे. जर आरोपांची पुष्टी झाली तर स्वामींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
खरे तर, अटकेच्या भीतीने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिन याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार असून, न्यायालयाने दिलासा नाकारल्यास पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.
अटकेच्या भीतीने स्वामी अविमुक्तेश्वरानंद अलाहाबाद उच्च न्यायालयात -अटकेच्या भीतीने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायमूर्ती जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाने दिलासा नाकारल्यास पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात.
बड्या राजकीय नेत्यांचा आणि वीआईपींचा सहभाग असल्याचाही आरोप -प्रयागराज येथील झुंसी पोलीस ठाण्यात स्वामी आणि त्यांचा शिष्य मुकुंदानंद गिरी यांच्यासह इतरांविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रारदार आशुतोष ब्रह्मचारी यांनी दावा केला आहे की, आपल्याकडे लॅपटॉपमध्ये लैंगिक शोषणाचे फोटो आणि व्हिडिओ यांसारखे ठोस पुरावे आहेत. एवढेच नाही तर, त्यांनी या प्रकरणात काही बड्या राजकीय नेत्यांचा आणि वीआईपींचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
महत्वाचे म्हणजे, दोन्ही पीडितांनी न्यायालयात लेखी साक्ष दिली असून त्यांची वैद्यकीय तपासणीही पूर्ण झाली आहे. त्यांनी सांगितले की पीडितांमध्ये अंदाजे २० पुरुष आणि महिला आहेत. त्यांनी जलतरण तलावासह आश्रमातील पुरावे नष्ट केल्याचा आणि अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Web Summary : Swami Avimukteshwaranand's woes deepen as medical reports confirm sexual abuse of minors. Police investigation intensifies; arrest looms. Swami seeks anticipatory bail. Allegations include destruction of evidence and financial fraud.
Web Summary : स्वामी अविमुक्तेश्वरानंद की मुश्किलें बढ़ीं, मेडिकल रिपोर्ट में नाबालिगों के यौन शोषण की पुष्टि। पुलिस जांच तेज, गिरफ्तारी की आशंका। स्वामी ने अग्रिम जमानत मांगी। सबूत नष्ट करने और वित्तीय धोखाधड़ी के आरोप भी।