धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 21:56 IST2024-10-05T21:56:22+5:302024-10-05T21:56:53+5:30
Pune Crime News: शाळेचा गणवेश परिधान करून शाळेत न आल्याने शिक्षकाने एका विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे

धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
शाळेचा गणवेश परिधान करून शाळेत न आल्याने शिक्षकाने एका विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुणे पोलिसांनी शनिवारी एका खासगी शाळेमधील सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानूष शिक्षा केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर स्वारगेट पोलीस पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ११५ (२) आणि किशोर न्याय अधिनियम २०१५ मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २७ सप्टेंबर रोजी पुण्यातील महर्षीनगरमधील एका खासगी शाळेत घडली होती. तक्रारीमधील उल्लेखानुसार आरोपी शिक्षकाने शाळेचा गणवेश परिधान न केल्याने विद्यार्थ्याला मारहाण केली होती. त्यामुळे सदर विद्यार्थ्याला जबर दुखापत झाली होती.दरम्यान, आरोपी शिक्षकाला नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.