उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीतून घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या हत्येला जीवन संपल्याचं रूप देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आरोपींचं बिंग फुटलं.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार १५ वर्षांपूर्वी मुझफ्फरनहर येथील सरोज नावाच्या महिलेने तिच्या सोनिया मुलीचा विवाह सोनू सैनी याच्यासोबत लावून दिला होता. तसेच लग्नानंतर तीसुद्धा मुलगी आणि जावयासोबत राहू लागली होती. दरम्यान, सरोज आणि तिच्या जावयामध्ये जवळीक वाढून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या दोघांनीही एकमेकांसोबत अश्लील व्हिडीओसुद्धा तयार केले. दरम्यान, सोनू याने सरोज हिच्या नावावर बिजनौर येथे एक प्लॉट खरेदी केला होता. त्याची किंमत आता वाढून २० लाख रुपये एवढी झाली होती. सोनूला ती जमीन विकायची होती. मात्र सासू सरोज आणि पत्नी सोनिया हिचा त्याला विरोध होता.
त्यावरून या तिघांमध्ये वादाला सुरुवात झाली. तसेच सोनू याने त्याच्याकडे असलेल्या अश्लील व्हिडीओंवरून सासूला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच जमीन विकण्यास नकार दिला तर हे व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी ही त्याने दिली. त्यानंतर सरोज आणि सोनिया यांनी मिळून सोनू याची हत्या करण्याचा कट आखण्यास सुरुवात केली. तसेच ११ ऑक्टोबर रोजी दोघींनीही मिळून हा डाव तडीस नेला. त्यांनी दुधामध्ये झोपेच्या गोळ्या घालून ते सोनूला पाजले. त्यानंतर रस्सीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह खोलीत गळफासाला टांगून त्याने जीवन संपवल्याचा कांगावा केला.
सोनू याने जीवन संपवल्याची वार्ता गावभर पसरली. तसेच घाईगडबडीत अंत्यसंस्कारही आटोपून घेण्यात आला. मात्र सोनूचा भाऊ मोनू याने याबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सारं प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी सासू सरोज आणि पत्नी सोनिया यांना ताब्यात घेऊव कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं. तसेच दोघींनीही आपला गुन्हा कबूल केला.