शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक.... दहशतवादी असल्याच्या संशयातून जमावाने केली हत्या

By admin | Updated: September 29, 2015 10:33 IST

उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे चक्क दहशतवादी असल्याच्या संशयावरुन जमावाने एका अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २९ - चोर असल्याच्या संशयातून जमावाने एखाद्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना आपण नेहमीच ऐकतो. पण उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे चक्क दहशतवादी असल्याच्या संशयावरुन जमावाने एका अज्ञात व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

कानपूरमधील महाराजपूर येथे पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची अफवा पसरली होती. रविवारी परिसरातील नागरिकांना एक अनोळखी व्यक्ती फिरताना आढळला होता. परिसरातील काही जणांनी त्याच्या चौकशीला सुरुवात केली. यादरम्यान काही जणांनी त्याला थेट काठीने मारहाण केली. परिसरातील अन्य नागरिकही यात सामील झाले व या सर्वांनी मिळून त्या व्यक्तीला काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर जमावाने त्या व्यक्तीचा मृतदेह नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने जमावाने मृतदेह तिथेच सोडून पळ काढला. मृत व्यक्ती हा मुस्लीम असल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.