शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जींसोबत शिवसेनाही मोर्चात

By admin | Updated: November 16, 2016 14:51 IST

नोटबंदीच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16-  नोटबंदीच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत यांच्यासह इतरही खासदार सहभागी झाले होते. तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सहभागी झाले होते. या 1 किलोमीटरच्या मार्चनंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींना नोटबंदीच्या निर्णयाविरोधातली एक याचिकाही सुपूर्द केली. विशेष म्हणजे या मोर्चात अरविंद केजरीवाल सहभागी झाले नाहीत. अरविंद केजरीवालांनी मोर्चात सहभागी होण्याचं ममता बॅनर्जी यांना आश्वासन दिलं होतं. मोर्चात शिवसेना सहभागी झाल्यामुळेच अरविंद केजरीवाल मोर्चात सहभागी न झाल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मोर्चात शिवसेना, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टीचे खासदार सहभागी झाले होते. 
दरम्यान, या मोर्चात शिवसेनेनं लोकसभेच्या 18 खासदारांसह राज्यसभेच्या तीन खासदारांना सहभागी होण्यास सांगितलं होतं. या सर्व प्रकारावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा मुद्दा नाही. लोकांना मोदींच्या निर्णयाचा त्रास होत असल्यानंच आम्ही या मोर्चात सहभागी झालो, असे संजय राऊत म्हणाले आहेत. यावेळी ममता बॅनर्जी यांनीही नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा आहे, मग 99 टक्के सामान्यांना का त्रास देत आहात, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. या मोर्चात राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेली शिवसेना सहभागी झाल्यानं भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.