शिवसेना 'युपीए'मध्ये जाणार नाही, संजय राऊतांचा पुन्हा 'शायराना अंदाज'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 09:18 AM2019-11-18T09:18:38+5:302019-11-18T09:19:13+5:30

शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे.

Shiv Sena will not go to UPA, Sanjay Rautani again shayari tweet | शिवसेना 'युपीए'मध्ये जाणार नाही, संजय राऊतांचा पुन्हा 'शायराना अंदाज'

शिवसेना 'युपीए'मध्ये जाणार नाही, संजय राऊतांचा पुन्हा 'शायराना अंदाज'

Next

नवी दिल्ली - भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे संसदेच्या दोन्ही सभागृहांत स्वतंत्र अस्तित्व पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत यावरून शिवसेनेचे खासदार शून्य प्रहरात केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीतूनही आज त्यांची भाजपाविरुद्ध बॅटींग सुरूच आहे.  

शिवसेनेच्या खासदारांसाठी लोकसभा व राज्यसभेत स्वतंत्र आसन व्यवस्था राहणार आहे. शिवसेनेचे लोकसभेत 18 सदस्य तर राज्यसभेत 3 सदस्य आहेत. लोकसभेत एनडीएचे 380 सदस्य आहेत. त्यापैकी शिवसेनेचे 18 सदस्य कमी झाल्याने एनडीएची सदस्यसंख्या 362 झालेली आहे. शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असली तरी, अजून काँग्रेसप्रणीत यूपीएमध्ये सामील झालेली नाही. तर, शिवसेना युपीएमध्ये सामिल होणार नसल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शेरो-शायरीद्वारे भाजपावर टीकास्त्र सोडले. 
तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था 
उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था :-
अशा आशयाची शायरी करत संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं आहे. मात्र, राऊत यांच्या या ट्विला रिप्लाय देताना, अनेकांनी शिवसेना आणि संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे. 
दरम्यान, भाजपसोबत काडीमोड घेतल्यामुळे शिवसेना खासदार सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेणार आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याबद्दल ते केंद्र सरकारला धारेवर धरणार आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तसे संकेत दिले आहेत. बिजू जनता दल (बीजेडी) सुद्धा गेल्या 10 वर्षांपासून कोणत्याही आघाडीत नाही. त्यामुळे बीजेडीच्या सदस्यांची आसन व्यवस्थाही स्वतंत्र आहे.


 

Web Title: Shiv Sena will not go to UPA, Sanjay Rautani again shayari tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.