शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

शशी थरूर यांची पुन्हा चौकशी होणार

By admin | Updated: January 21, 2015 01:31 IST

माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकवार चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकवार चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे. याआधी झालेल्या चौकशीदरम्यान थरुर यांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांचा उद्देश सत्यापर्यंत पोहचणे हा असून त्यासाठी या प्रकरणाशी जुळलेल्या प्रत्येक पैलूचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले. त्यांना पुन्हा एकदोन दिवसात चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. एक दिवस आधी झालेल्या चौकशीत थरुर यांच्याकडे आम्ही त्यांच्या पार्श्वभूमीबाबत चौकशी केली. तसेच त्या दिवशी काय झाले याबाबत विचारणा केली. प्रसिद्धी माध्यमात जे वृत्त प्रसिद्ध झाले त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले होते व त्याबाबत आम्ही त्यांच्याकडे माहिती मागितली असे बस्सी यांनी सांगितले. थरुर यांच्याकडे सोमवारी रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. थरुर यांच्यासोबत स्पष्टवक्तेपणाने विचारणा करण्यात आली. घटना घडली त्या दिवशी नेमके काय झाले याचा आम्ही शोध घेत आहोत. मात्र आताच त्याचा निष्कर्ष सांगता येणार नाही असे बस्सी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)