sharda Devi fighting with Covid 19 from Nearly Five Months | 'ती' ५ महिन्यांपासून कोरोनाशी लढतेय; ३१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं डॉक्टर बुचकळ्यात

'ती' ५ महिन्यांपासून कोरोनाशी लढतेय; ३१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं डॉक्टर बुचकळ्यात

भरतपूर: देशात आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. आतापर्यंत १ कोटी ६ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी जवळपास १ कोटी ३ लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या घडीला देशात २ लाखांहून कमी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र राजस्थानच्या भरतपूरमधील एका महिलेला झालेल्या कोरोनामुळे डॉक्टर वर्ग बुचकळ्यात पडला आहे.

तीन दिवसांत कोव्हॅक्सिनचे ८९ डोस वाया, एकदा उघडल्यास ४ तासच टिकताे, भारत बायोटेकची माहिती

भरतपूरच्या अपना घर आश्रमात भरती असलेल्या शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढत आहेत. ४ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र अद्याप त्या कोरोनामुक्त झालेल्या नाहीत. गेल्या ५ महिन्यांत त्यांच्या ३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्या सगळ्या पॉझिटिव्ह आल्या. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शारदा देवी बऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरदेखील चिंतेत आहेत. अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी आता शारदा देवी यांना जयपूरमध्ये हलवण्यात येणार आहे.

काळजी वाढली! फेब्रुवारी मार्चमध्ये भारतात येणार कोरोनाची दुसरी लाट? तज्ज्ञांनी सांगितले की...

अपना घर आश्रमचे संचालक डॉ. बी. एम. भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा देवींच्या आई वडिलांचं निधन झालं आहे. त्यांना सासरच्या माणसांनी घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर त्या अपना आश्रमात आल्या. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ४ सप्टेंबरला चाचणीचा अहवाल आला. तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत ३१ वेळा शारदा देवींची कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टर चिंतेत आहेत.

शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाची लागण झालेले रुग्ण काही दिवसांत बरे होतात. मात्र शारदा देवी कोरोनामुक्त होत नसल्यानं डॉक्टरदेखील आश्चर्य चकित झाले आहेत. शारदा देवींना लवकरच उपचारांसाठी जयपूरला नेण्यात येणार आहे. गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शारदा देवींचं वजनदेखील वाढतं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sharda Devi fighting with Covid 19 from Nearly Five Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.