विवाहीत महिलेचा १६ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: October 17, 2015 17:00 IST2015-10-17T17:00:51+5:302015-10-17T17:00:51+5:30

एका प्रौढ महिलेने १६ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याची आणि नंतर त्याच्यावरच बलात्काराचा आरोप केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे

Sexual harassment of a 16-year-old married woman | विवाहीत महिलेचा १६ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

विवाहीत महिलेचा १६ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

>ऑनलाइन लोकमत
राजगढ (मध्य प्रदेश), दि. १७ - एका प्रौढ महिलेने १६ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याची आणि नंतर त्याच्यावरच बलात्काराचा आरोप केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. झांझडपुरा येथे हा प्रकार घडला आहे. लग्न झालेल्या एका महिलेने १६ वर्षांच्या मुलाला नादी लावले व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. जवळपास दोन महिने तो मुलगा गप्पा राहिला. परंतु नंतर महिलेशी अनैतिक वर्तन केल्याचा आरोप करत त्या महिलेच्या पतीने मुलाचे अपहरण केले त्याला मारहाण केली आणि सोडवणूक करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे १० लाख रुपयांची मागणी केली.
गरीबीमुळे मुलाच्या वडिलांनी हे शक्य नसल्याचे सांगितले तेव्हा त्या महिलेने व तिच्या कुटुंबाने त्याला पोलीसांच्या ताब्यात दिले व बलात्काराचा आरोप केला. परंतु जेव्हा पोलीसांनी मुलगा व महिला दोघांची जबानी घेतली त्यावेळी सत्य प्रकार समोर आला आणि त्या महिलेनेच त्याला नादी लावल्याचे व त्याच्या लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. सदर महिला, तिचा पती रोडीलाल, व अजय, मंगीलाल व फूलसिंग या अन्य नातेवाईंकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Sexual harassment of a 16-year-old married woman