सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By Admin | Updated: February 19, 2016 00:40 IST2016-02-19T00:40:46+5:302016-02-19T00:40:46+5:30

एकाला अटक : दोघे फरार

Sex racket exposed | सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ाला अटक : दोघे फरार
नागपूर : सोनेगाव पोलिसांनी आज रात्री श्यामनगरातील एका पॉश कुंटणखान्यावर धाड घालून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. येथे एका वारांगनेसोबत सापडलेल्या ग्राहकाला पोलिसांनी अटक केली. त्याचे दोन साथीदार मात्र पळून गेले.
श्यामनगरातील जय हिंद सोसायटीत गजशोभा अपार्टमेंट आहे. येथील नागेंद्र आथनकर याच्या सदनिकेत वेश्या व्यवसाय चालतो, ही माहिती सोनेगाव पोलिसांना कळली. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप येळे, उपनिरीक्षक नीलेश पिंपळशेंडे, अरुण पंढरी घुगल, साजिद अहमद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे धाड घातली. पोलिसांना सदनिकेत एक वारांगना आणि ग्राहक नको त्या अवस्थेत सापडले. कुंटणखाना चालविणारा विक्की आणि घरमालक आथनकर पळून गेले. पोलिसांनी आरोपी निखिल प्रदीप जैन याला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुंटणखाना सुरू होता, हे चौकशीत स्पष्ट झाले. पोलीस फरार झालेल्या नागेंद्र आणि विक्कीचा शोध घेत आहेत. दरम्यान, आपल्या सहनिवासात कुंटणखाना सुरू असल्याची बाब उघड झाल्यानंतर सहनिवासी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Sex racket exposed