शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सत्र न्यायालयात निर्दोष, हायकोर्टात सश्रम कारावास

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

काटोलमधील घटना : मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

काटोलमधील घटना : मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

नागपूर : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात सत्र न्यायालयातून निर्दोष सुटलेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
नारायण चंपतराव चौरे (३७) असे आरोपीचे नाव असून तो काटोल येथील रहिवासी आहे. दुसरा आरोपी कृष्णा लक्ष्मण चव्हाण (२८) याचा उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना २४ एप्रिल २०१२ रोजी मृत्यू झाला. २३ ऑगस्ट २००१ रोजी दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा दोघांवर आरोप होता. १५ मे २००३ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपींना भादंविच्या कलम ३६६-अ (अल्पवयीन मुलीला गर्भवती करणे) व ३७६-जी (अत्याचार) या आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध शासनाने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपी चौरेला भादंविच्या कलम ३७६, ५११ (अत्याचाराचा प्रयत्न) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले होते.