दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा -भारत

By Admin | Updated: May 25, 2015 00:52 IST2015-05-25T00:52:57+5:302015-05-25T00:52:57+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तसेच हाफीज सईद आणि झकीर रहमान लख्वी या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांची संपत्ती जप्त करा, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे

Seize assets of Dawood, Hafeez and Lakhvi - India | दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा -भारत

दाऊद, हाफीज, लख्वीची संपत्ती जप्त करा -भारत

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तसेच हाफीज सईद आणि झकीर रहमान लख्वी या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांची संपत्ती जप्त करा, अशी मागणी भारत पाकिस्तानकडे करणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा प्रतिबंधक यादीत या तिघांचीही नावे आहेत. त्यामुळे या तिघांचीही संपत्ती गोठविणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे, असा भारताचा युक्तिवाद आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी याबाबतचे संकेत दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा आणि तालिबान प्रतिबंधक समितीने तयार केलेल्या यादीत दाऊद, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वी या तिघांचीही नावे असून त्यांच्यावर प्रतिबंध लादले आहेत. संयुक्त राष्ट्राचा सदस्य या नात्याने या तिघांचीही संपत्ती जप्त करणे पाकिस्तानची जबाबदारी आहे. या आधारावर या तिघांचीही संपत्ती गोठवली आहे का? अशी औपचारिक विचारणा भारत पाकिस्तानकडे करणार आहे. संपत्ती गोठवली नसेल तर ती तात्काळ गोठवावी, अशी मागणीही भारत करेल, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Seize assets of Dawood, Hafeez and Lakhvi - India