शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

School Reopening: लहान मुलांच्या शाळा सुरू करू नका, जाणकारांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:44 AM

School Reopening News: दिल्ली मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष आणि पीडिएट्रिक्स डॉक्टर अरुण गुप्ता म्हणाले की, ज्या देशात शाळा सुरू झाल्या, तिथे रुग्ण वाढले.

ठळक मुद्दे सर्व्हेत लहान मुलांमध्ये 57 टक्के अँटीबॉडी मिळाल्या

नवी दिल्ली: सीरो सर्व्हे रिपोर्टच्या आधारावर आयसीएमआरने लहान मुलांच्या शाळा सुरू करण्याबाबत भाष्य केलं आहे. पण, रिपोर्टमध्ये लहान-मोठे मुलं आणि अडल्टमध्ये अँटीबॉडी सापडण्याचे प्रमाण फक्त 5 ते 10 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, अजून दोन-तीन महिने वाट पाहावी, असं काही डॉक्टरांचं मत आहे. 6 ते 9 वयोगटातील 57.2 मुलांमध्ये अँटीबॉडी मिळाल्या आहेत, म्हणजे ज्या 40 कोटी लोकांना अजूनही संक्रमणाचा धोका आहे, त्यातील अर्धे लहान मुलं आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या शाळा सुरू करण्यास घाई करू नये, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'जिथे शाळा सुरू झाल्या, तिथे कोरोना रुग्ण वाढले'दिल्ली मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष आणि पीडिएट्रिक्स डॉक्टर अरुण गुप्ता सांगतात की, ज्या देशांमध्ये शाळा सुरू केल्या, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी घाई करू नये. तसेच, ज्या मुलांमध्ये अँटीबॉडी मिळाल्या ते पुन्हा संक्रमित होणार नाही, याची काय शास्वती आहे. अशी मुले संक्रमित झाल्यावर सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असेही गुप्ता म्हणाले. 

सर्व्हेत लहान मुलांमध्ये 57 टक्के अँटीबॉडी मिळाल्यामेदांताच्या पीडिएट्रिक्स डॉक्टर नीलम मोहन यांनी सांगितले की, मागच्या सर्व्हेच्या तुलनेत या सर्व्हेमधून मुलांमध्ये अँटीबॉडी वाढल्याचे प्रमाण दिसून आले आहे. 6 ते 9 वयोगटातील मुलांमध्ये 57.2 टक्के अँटीबॉडी मिळाल्या, तर 10 ते 17 वयोगटातील मुलांमध्ये 61.6 टक्के अँटीबॉडी आढळल्या. यांची एकूण टक्केवारी 67.6 आहे. यातून मुलेही संक्रमित होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास घाई करू नका. राज्यातील परिस्थिती पासून त्या-त्या राज्य सरकारांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच, शाळा सुरू करण्यापूर्वी एक फुल प्रुफ प्लॅन तयार करावा, असंही मत नीलम यांनी व्यक्त केलंय.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा