‘बीफ पार्टी’ देणाऱ्या आमदारावर शाईफेक

By Admin | Updated: October 20, 2015 04:19 IST2015-10-20T04:19:17+5:302015-10-20T04:19:17+5:30

श्रीनगरच्या आमदार निवासात बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू-काश्मीरचे आमदार शेख अब्दुल राशिद यांच्या तोंडाला सोमवारी नवी दिल्ली येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी

Schaeferk, the MLA giving 'beef party' | ‘बीफ पार्टी’ देणाऱ्या आमदारावर शाईफेक

‘बीफ पार्टी’ देणाऱ्या आमदारावर शाईफेक

नवी दिल्ली : श्रीनगरच्या आमदार निवासात बीफ पार्टीचे आयोजन करणारे जम्मू-काश्मीरचे आमदार शेख अब्दुल राशिद यांच्या तोंडाला सोमवारी नवी दिल्ली येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. बीफ पार्टी दिल्याचा निषेध नोंदवीत या कार्यकर्त्यांनी राशिद यांच्या चेहऱ्यावर शाई, रंग आणि मोबील आॅईल फेकले.
९ आॅक्टोबर रोजी जम्मूच्या उधमपूर येथे गोमांस नेत असल्याच्या संशयावरून जमावाने दोन ट्रक चालकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी १९ वर्षीय झाहिदचा रविवारी मृत्यू झाला. इंजिनिअर राशिद या नावाने ओळखले जाणारे राशिद हे या दोन्ही ट्रकचालकांच्या नातेवाईकांना घेऊन नवी दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषद घेण्यासाठी आले होते.
राशिद हे पत्रपरिषदेला संबोधित केल्यानंतर प्रेस क्लबबाहेर काही टीव्ही पत्रकारांशी वार्तालाप करीत असतानाच, ‘गो माता का अपमान, नही सहेंगा हिंदुस्तान’ अशा घोषणा देत काही कार्यकर्ते त्यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांनी राशिद यांच्या चेहऱ्यावर शाई, काळा रंग व मोबील आॅईल फेकले.
दरम्यान, या शाईफेकप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि राशिद यांना संरक्षण देत त्यांना प्रेस क्लबच्या आत नेले. याआधी जम्मू-काश्मीर विधानसभेत भाजपच्या आमदारांनी राशिद यांना मारहाण केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Schaeferk, the MLA giving 'beef party'