'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:53 IST2025-05-16T16:52:40+5:302025-05-16T16:53:08+5:30

Sanjay Nirupam News: 'राजकारणाच्या नावाखाली भारतीय सैन्याचा अपमान करू नये.'

Sanjay Nirupam News: 'Those who doubt BJP are in Pakistan...' Shinde group leader Sanjay Nirupam's big statement | 'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य

'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य

Operation Sindoor:शिवसेना(शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशासह आणि भाजपच्या तिरंगा यात्रेवर आपले मत व्यक्त केले आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली.

मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, भाजपने देशभरात तिरंगा यात्रा आयोजित केली आहे, ज्याला व्यापक जनसमर्थन मिळत आहे. जम्मूमधील तिरंगा यात्रेत 10 हजारांहून अधिक लोकांनी भाग घेतला आणि सैन्याचे आभार मानले. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना ते म्हणाले, सैन्याने 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारले, काही किरकोळ नुकसान वगळता, भारताने या मोहिमेत पूर्ण विजय मिळवला, आम्हाला त्याचा अभिमान आहे.

'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानची स्थिती पहावी'
निरुपम पुढे म्हणाले, शिवसेनेनेही त्याच भावनेने तिरंगा यात्रा आयोजित केली आहे, जी 18 मे रोजी मुंबईपासून सुरू होईल. भाजपवर शंका घेणाऱ्यांनी जाऊन पाकिस्तानची अवस्था पहावी, आज पाकिस्तान तुटलेला आणि विखुरलेला आहे. राजकारणाच्या नावाखाली भारतीय सैन्याचा अपमान करू नये, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

सैन्याला जात नाही
आपल्या सैन्याला कोणतीही जात नाही, ती सर्वांची आहे. सैनिकांची जात सांगणे, हा सैन्याचा अपमान आहे. सपा खासदार राम गोपाल यादव यांच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि एअर मार्शल ए.के. भारती यांची जात सांगण्याबाबतच्या विधानावर त्यांची ही प्रतिक्रिया आली.

तुर्कीबद्दल काय म्हणाले?
तुर्कीच्या बहिष्कारावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातून भारत आणि तुर्कीमधील संबंध सुधारत होते, परंतु तुर्कीच्या अलीकडील भूमिकेवरून हे स्पष्ट झाले आहे की, ते इस्लामिक राष्ट्रासारखे वागत आहे. तुर्कीने ज्या प्रकारे दहशतवादाला पाठिंबा दिला, त्यामुळे हा देश स्वतःच 'दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा राष्ट्र' बनला आहे. जनतेचा रोष लक्षात घेऊन भारत सरकारने तुर्कीविरुद्ध कारवाई केली आहे. व्यापाऱ्यांनी आता तुर्की आणि अझरबैजान सारख्या देशांशी संबंध ठेवू नये. तुर्की हा अमेरिकेचा मित्र देश आहे, पण भारताचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, भारताने आता त्याच्याशी संबंध ठेवू नयेत, असेही म्हणाले.

Web Title: Sanjay Nirupam News: 'Those who doubt BJP are in Pakistan...' Shinde group leader Sanjay Nirupam's big statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.