नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार तोष्णीवाल नेत्रपेढी : संदीप जव्हेरी, करवा यांना पुरस्कार

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30

सोलापूर :

Sandeep Jhaveri, Karwa award for Toshniwal eye affair | नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार तोष्णीवाल नेत्रपेढी : संदीप जव्हेरी, करवा यांना पुरस्कार

नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार तोष्णीवाल नेत्रपेढी : संदीप जव्हेरी, करवा यांना पुरस्कार

लापूर :
मिर्शीबाई तोष्णीवाल नेत्रपेढीच्या वतीने नेत्रदान केलेल्या दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांचा रविवारी समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. नेत्रदानाच्या चळवळीचा प्रसार केल्याबद्दल संदीप जव्हेरी आणि र्शीकिशन करवा यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तोष्णीवाल नेत्रपेढीचे प्रमुख नेत्रतज्ज्ञ डॉ. श्याम तोष्णीवाल आणि डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी या समारंभाचे आयोजन केले होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या या समारंभास अश्विनी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, प्रा. डॉ. नसीम पठाण हे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. आर. प?णशे?ी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पटेल यांच्या हस्ते जव्हेरी आणि करवा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पाच हजार रूपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. करवा यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र मधू करवा यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी 53 नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. पठाण म्हणाल्या, डॉ. तोष्णीवाल यांच्या नेत्रदानाच्या या कार्यामुळे अनेक रूग्णांना दृष्टी प्रदान झाली आहे. या कार्याची व्यापकता आणखी वाढत जाणार आहे. पटेल म्हणाले, तोष्णीवाल नेत्रपेढीने चालविलेली ही चळवळ कौतुकास्पद असून, नेत्रदानाबरोबर देहदानाची चळवळही गतिशील व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. प?णशे?ी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. नवनीत यांनी नेत्रदानावरील चित्रफीत दाखवून या चळवळीची माहिती दिली.
या समारंभाचे सूत्रसंचालन निखिल तोष्णीवाल यांनी केले. चंदुभाई देढीया यांनी आभार मानले.
...........फोटो आहे..............................

Web Title: Sandeep Jhaveri, Karwa award for Toshniwal eye affair