Salon Owner's Daughter Who Spent Lakhs On The Poor Wins UN Praise | शिक्षणासाठी जमवलेले पैसे गरिबांसाठी खर्च केले, भारताच्या कन्येला UN ने गौरवले!

शिक्षणासाठी जमवलेले पैसे गरिबांसाठी खर्च केले, भारताच्या कन्येला UN ने गौरवले!

मागील पाच महिन्यांपासून जग कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 68 लाख 75,257 इतकी झाली आहे. त्यापैकी 33 लाख 69,095 रुग्ण बरे झाले आहेत आणि 3 लाख 98, 692 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 2 लाख 37,754 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 14,073 रुग्ण बरे झाले आहेत, तर 6650 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण, या काळात हातावर पोट असलेल्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. या संकटकाळात माणूसकीचं दर्शन घडवणारे अनेक प्रसंग आपल्या देशात घडताना दिसत आहेत. 

'कोरोना व्हायरस से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कुणाचा माहित्येय?

तामिळनाडूमधील मदुराई येथील सलूनच्या दुकान मालकाची मुलगी एम नेत्रा हिची United Nations Association for Development and Peace (UNADAP) नं 'गरिबांच्या कल्याणासाठी काम करणाऱी सदिच्छादूत' म्हणून नियुक्ती केली आहे. नेत्रानं तिच्या शिक्षणासाठी जमवलेले 5 लाख रुपये लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या गरिबांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिनं वडिलांचीही मनधरणी केली. 

राज्याचे मंत्री सेल्लूर राजू यांनी नेत्राच्या या समाजकार्याचे कौतुक केले आणि तिला दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं सन्मानित करावं, अशी विनंती सध्याचे मुख्यमंत्री ई पलनिस्वामी यांच्याकडे करणार असल्याचेही राजू यांनी सांगितले. ते म्हणाले,''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या मुलीचे कौतुक केले होते. मदुराईची मान तिनं अभिमानानं उंचावली. UNच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची संधी मिळाल्यानं आणि गरीबांना मदत करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.''

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात मुलीचे वडील सी मोहन यांचे कौतुक केले होते. मोदी म्हणाले होते की,''श्री मोहन जी मदुराई येथे सलून चालवतात. त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पाच लाख रुपये जमा केले होते, परंतु त्यांनी ती संपूर्ण रक्कम गरजू आणि गरीबांच्या कल्याणासाठी वापरली.''

न्यू यॉर्क आणि जिनेव्हा येथे UNADAP च्या परिषदेत नेत्राला आमंत्रित केले गेले आहे आणि तेथे तिला हा अनुभव सांगण्याची संधी दिली जाणार आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'

Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

वर्णद्वेशाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत! 

धक्कादायक : कोरोनामुळं महाराष्ट्राच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

Fact Check : विराट-अनुष्काचा घटस्फोट? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce? 

फुटबॉलपटूंना लॉकडाऊनमध्ये केस कापणं पडलं महागात; भरावा लागला लाखोंचा दंड! 

आदित्य ठाकरेंनी केली फुटबॉलपटूची मदत; 72 दिवस अडकला होता मुंबई विमानतळावर!

Video: पठ्ठ्याच्या फलंदाजीला तोड नाही; कधी मेणबत्ती विझवतो, तर कधी बॉटलचं झाकण उघडतो!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salon Owner's Daughter Who Spent Lakhs On The Poor Wins UN Praise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.