3D cricket match video viral on social media | Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि अडीच-तीन महिने क्रिकेट स्पर्धांना ब्रेक लागला. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराश झाली आहे. 8 जुलैपासून इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात होणार आहे. पण, या अडीच महिन्यांत क्रिकेट चाहत्यांना जुन्या सामन्यांच्या हायलाईट्सवर समाधान मानावे लागले. पण, आज आपण क्रिकेट सामन्याची अशी हायलाईट्स पाहणार आहोत, ज्यात थ्री डी इफेक्टपण आहे. पैज लावून सांगू शकतो की आयुष्यात असा क्रिकेट सामना तुम्ही पाहिला नसेल.

सध्या सोशल मीडियावर 3 D क्रिकेट मॅचचा सामन्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सामन्यात काही मुलं टीव्ही समोर  बसून मॅच पाहत आहे आणि अचानक मॅच खेळणारा खेळाडू टिव्हीमधून हात बाहेर काढून मुलांकडे चेंडू मागतो. खरं तर तो टीव्हीनसून एक बॉक्स आहे आणि बॉक्सच्या दुसऱ्या बाजूला मुलं क्रिकेट खेळत आहे. 
 

पाहा हा मजेशीर व्हिडीओ...

Video : क्वारंटाईनमुळे रुसलेल्या लेकीला हसवण्यासाठी बापाची अनोखी शक्कल; पाहून तुम्हीही कराल कौतुक

कोरोना संकटात 'जादू की झप्पी' मिस करताय; आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला Video पाहाच

जंगल बुक : 12 वर्षांच्या मुलामागे लागला अस्वल; त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्वच झाले हैराण

हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video

 

English summary :
Watch 3D cricket Match

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 3D cricket match video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.