कोरोना संकटात 'जादू की झप्पी' मिस करताय; आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला Video पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:18 PM2020-05-19T20:18:46+5:302020-05-19T20:19:54+5:30

या संकटात प्रत्येकाला हवी आहे, आपल्या प्रियजनाची 'जादू की झप्पी...'  

This invention will rank as a life-changing one, Anand Mahindra Share heart touching Video svg | कोरोना संकटात 'जादू की झप्पी' मिस करताय; आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला Video पाहाच

कोरोना संकटात 'जादू की झप्पी' मिस करताय; आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला Video पाहाच

googlenewsNext

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. वर्तमानपत्र, चॅनेल, आकाशवाणी सर्वत्र कोरोनाच्याच बातम्या वाचायला, पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. लॉकडाऊमुळे लोकांना घरातच थांबावे लागत आहे. पण, हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मजूर पायी आपापल्या गावी जाण्यासाठी आटापीटा करत आहेत. त्यांच्या डोळ्यांतील व्यथा, हतबल झालेले चेहरे आणि लहान मुलांचे होत असलेले हाल, पाहून मन सुन्न झाले आहे. पण, या काळात हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी सायंकाळपर्यंत 49 लाख 26,167 इतकी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 28,330 रुग्ण बरे झाले असले तरी 3 लाख 20,874 जणांना प्राण गमवावा लागला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 2335 वर पोहोचली असून 3169 जणांचा मृत्यू झाला आहे. 39, 674 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना संकटात प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखून वागणं हीच काळाची गरज आहे. कमी अधिक प्रमाणात या संकटाचा सर्वांनाच फटका बसला आहे. अशा या संकटात प्रत्येकाला हवी आहे, आपल्या प्रियजनाची 'जादू की झप्पी...'  

'महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. तो पोस्ट तुमच्या आमच्या सर्वांना सुखावणारा आहे. कोरोना संकटात आपल्याला हवी हवीशी जादू की झप्पी, हा व्हिडीओ पाहून का होईना आपण फिल करू शकतो... चला तर मग पाहूया आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेली जादू की झप्पी.

पाहा व्हिडीओ...


 

Web Title: This invention will rank as a life-changing one, Anand Mahindra Share heart touching Video svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.