Social Viral : 12 year old boy keeps calm when huge bear following him italian hills, watch video svg | जंगल बुक : 12 वर्षांच्या मुलामागे लागला अस्वल; त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्वच झाले हैराण

जंगल बुक : 12 वर्षांच्या मुलामागे लागला अस्वल; त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्वच झाले हैराण

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 12 वर्षांच्या एका मुलाचा हा व्हिडीओ आहे. यात तो एक जंगलात दिसत असून एका डोंगरावरून खाली उतरताना दिसत आहे आणि अचानक हे माहित पडतं की, त्याच्या मागे विशाल अस्वल लागला आहे. एलेसेंड्रो असं या 12 वर्षीय मुलाचं नाव असून तो इटलीत राहणारा आहे. उत्तर इटलीतील ट्रेंटिनो डोंगरातील आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत पायी प्रवास करत आहे. 

एलेसेंड्रोचा याच प्रवासातील हा व्हिडीओ आहे. त्यात तो डोंगरावरून खाली उतरत आहे. पण, त्याच्या मागे विशाल अस्वस असल्याचे व्हिडीओ शुट करणारा व्यक्ती सांगत आहे. पण, अस्वल मागे असूनही हा मुलगा जराही घाबरला नाही. तो सावकाश एक एक पाऊल खाली उतरताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यास तो अस्वलही एलेसेंड्रोच्या जवळ येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण, तो त्याच्या जास्त जवळ आला नाही आणि एलेसंड्रो सुखरूप खाली उतरला.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा 

शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा

Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...

ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022पर्यंत स्थगित होणार?; ICCच्या सूत्रांची माहिती

... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी! 

आलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Social Viral : 12 year old boy keeps calm when huge bear following him italian hills, watch video svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.