'कोरोना व्हायरस से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कुणाचा माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:58 PM2020-06-06T17:58:04+5:302020-06-06T18:01:59+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Jasleen bhallas voice behind this covid 19 caller tune here you should know about her | 'कोरोना व्हायरस से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कुणाचा माहित्येय?

'कोरोना व्हायरस से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कुणाचा माहित्येय?

googlenewsNext

मागील पाच महिन्यांपासून जग कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 68 लाख 75,257 इतकी झाली आहे. त्यापैकी 33 लाख 69,095 रुग्ण बरे झाले आहेत आणि 3 लाख 98, 692 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 2 लाख 37,754 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 14,073 रुग्ण बरे झाले आहेत, तर 6650 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जवळपास 60 दिवस देशात लॉकडाऊन सुरू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कॉलर ट्यूनवरूनही जनजागृती केली जात आहे. 

आपण दुसऱ्या व्यक्तीला कॉल केल्यानंतर आपल्याला कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. या कॉलर ट्यूनमध्ये आपल्याला सांगितले जाते की,''कोरोना व्हायरस किंवा कोविड-19 शी आज संपूर्ण देश संघर्ष करत आहे. पण हे लक्षात ठेवा आपल्याला व्हायरसशी लढायचे आहे, रुग्णाशी नाही. त्यांच्याशी भेदभाव करू नका. त्यांची काळजी घ्या.  डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी हे ढाल बनून कोरोना व्हायरसपासून आपले संरक्षण करत आहेत. त्यांचा सन्मान करा आणि त्यांना सहकार्य करा. या योद्ध्यांची काळजी घेतली, तर देश कोरोनावर मात करेल. अधिक माहितीसाठी राज्य हेल्प लाईन नंबर किंवा सेंट्रल हेल्प लाईन नंबर 1075 वर कॉल करा.'' ही जनजागृती हिंदीतून केली जात आहे. 

आपण सर्वांनी हा संदेश ऐकला असेलच.. पण, हा आवाज कुणाचा आहे, हे माहित्येय का? आपल्या मधुर आवाजानं कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये जनजागृती करणारा हा आवाज जसलीन भल्लाचा आहे. जसलीन भल्ला ही प्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आहे. टीव्ही आणि रेडिओवरील अनेक जाहिरातींना तिनं आवाज दिला आहे. एक क्रीडा पत्रकार म्हणून जसलीनच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर तिनं व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून स्वतःला व्यग्र केले आणि मागील दहा वर्षांपासून ती हे काम करत आहे.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'

Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

वर्णद्वेशाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत! 

धक्कादायक : कोरोनामुळं महाराष्ट्राच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

Fact Check : विराट-अनुष्काचा घटस्फोट? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce? 

फुटबॉलपटूंना लॉकडाऊनमध्ये केस कापणं पडलं महागात; भरावा लागला लाखोंचा दंड! 

आदित्य ठाकरेंनी केली फुटबॉलपटूची मदत; 72 दिवस अडकला होता मुंबई विमानतळावर!

Video: पठ्ठ्याच्या फलंदाजीला तोड नाही; कधी मेणबत्ती विझवतो, तर कधी बॉटलचं झाकण उघडतो!

 

Web Title: Jasleen bhallas voice behind this covid 19 caller tune here you should know about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.