Virat kohli and Anushka sharma divorce? Why is #VirushkaDivorce trending on social media? | Fact Check : विराट-अनुष्काचा घटस्फोट? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce?

Fact Check : विराट-अनुष्काचा घटस्फोट? सोशल मीडियावर का ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे क्रिकेट-बॉलिवूड मधील नेहमी चर्चेत राहणारं कपल आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाडतात. 2017मध्ये मोजक्याच नातेवाईकांसह विराट-अनुष्कानं इटली मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर ही जोडी विरुष्का म्हणून ओळखली जाऊ लागली. पण, आता ही जोडी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर विरुष्का घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. #VirushkaDivorce असा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्माची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताल लोक' नुकतीच प्रदर्शित झाली. त्यावरून वादाला तोंड फुटलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून ‘पाताल लोक’ प्रचंड वादात आहे. यानिमित्ताने अनुष्काला कायदेशीर नोटीसही बजावली गेलीय. तिच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आता तर हा वाद तिच्या संसारावर उठू पाहतोय. होय, विराट कोहलीने अनुष्का शर्माला घटस्फोट द्यावा, असा अजब सल्ला भाजपा आमदाराने दिला होता. 

गाझियाबादेतील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी ‘पाताल लोक’ प्रकरणी अनुष्काविरोधात तक्रार दाखल आहे.  या वेबसीरिजध्ये आपल्या परवानीशिवाय आपला फोटो वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  आता याच नंदकिशोर गुर्जर यांनी या वादावरुन  विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी  मागणी केली आहे. त्यामुळे #VirushkaDivorce हा ट्रेंड व्हायरल होत आहे.


विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'

Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

वर्णद्वेशाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत! 

धक्कादायक : कोरोनामुळं महाराष्ट्राच्या माजी फुटबॉलपटूचे निधन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Virat kohli and Anushka sharma divorce? Why is #VirushkaDivorce trending on social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.