काळवीटप्रकरणी सलमानची याचिका फेटाळली

By Admin | Updated: May 15, 2015 01:17 IST2015-05-15T01:17:27+5:302015-05-15T01:17:27+5:30

बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पाच साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी बोलावण्याची अभिनेता सलमान खान याने केलेली विनंती जोधपूरच्या

Salman's plea rejected in blackmoney | काळवीटप्रकरणी सलमानची याचिका फेटाळली

काळवीटप्रकरणी सलमानची याचिका फेटाळली

जोधपूर : बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पाच साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी बोलावण्याची अभिनेता सलमान खान याने केलेली विनंती जोधपूरच्या न्यायालयाने फेटाळली आहे. काळवीटाच्या शिकारप्रकरणी सलमानवर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याचे पाहता हा त्याला जबर धक्का मानला जात आहे.
१-२ आॅक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री जोधपूरजवळ कांकानी या गावी सलमान खान याने काळवीटाची शिकार केल्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला होता. सलमान खान याच्या शस्त्रपरवान्याची मुदत संपली होती, त्यामुळे त्याने बेकायदेशीररीत्या शस्त्रे वापरल्याचा आरोप होता. काळवीट हा संरक्षित प्राणी असल्यामुळे त्याची शिकार हा दंडनीय गुन्हा आहे. २३ एप्रिल रोजी सलमान खान याने प्रकृती ठीक नसल्याच्या आधारावर हजर न राहण्याची सवलत मागितली.

Web Title: Salman's plea rejected in blackmoney