प्रतिबंधित पदार्थाची विक्री

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:58+5:302014-12-19T22:56:58+5:30

दुकानदारासह कंपन्यांवरही गुन्हे दाखल

Sale of prohibited substances | प्रतिबंधित पदार्थाची विक्री

प्रतिबंधित पदार्थाची विक्री

कानदारासह कंपन्यांवरही गुन्हे दाखल
नागपूर : बंदी असूनही अपायकारक पेय, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला विकणारा दुकानदार तसेच त्याला प्रतिबंधक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकावर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने कॉफी हाऊस चौकातील रमेश रुचिलाल लालवानी यांच्या दुकानात बुधवारी सकाळी तपासणी केली. येथे मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू, पान मसाला आणि शरीरास अपायकारक पेय विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. ते जप्त करण्यात आले. प्रवीण अजाबराव उमप (वय ४१) यांच्या तक्रारीवरून पाोलिसांनी लालवानी तसेच नोएडा (उत्तर प्रदेश) येथील घनश्याम सत्यपाल लिमिटेड, धरमपाल प्रेमचंद लि., धरमपाल सत्यपाल लि़ (गुवाहाटी), मे़ झेन टोबॅको प्रा़ लि. (अहमदाबाद), एम.एस. गॅट फ्रे फिलिप्स इंडिया लि़ (गाजियाबाद) या कंपन्यांच्या संचालकांवर सीताबर्डी गुन्हे दाखल केले. लालवानी यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पानमसाला, तंबाखूच्या साठ्याची किंमत १ लाख, ९ हजार, २६६ रुपये आहे.
---

Web Title: Sale of prohibited substances