शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:11 IST

"सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव सचिन पायलट यांच्यासोबत होता. म्हणूनच त्यांना हे सर्व मिळाले."

ठळक मुद्दे काँग्रेसच्या हाय कमांडने राजेश पायलट यांच्याशी अर्धाडझन वेळा संवाद साधला.सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनीही अनेक वेळा पायलट यांच्याशी संवाद साधला.काँग्रेसने फार कमी वयात पायलटांना दिल्या होत्या मोठ्या जबाबदाऱ्या.

नवी दिल्ली -राजस्थानातकाँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हातात घेत, राजस्थानातील गेहलोत सरकारलाच आव्हान दिले होते. यामुळे काँग्रेसने त्यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरू आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर कांग्रेसचे माध्यम प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी यासंदर्भात घोषणा केली. पायलटांवर केलेल्या कारवाईची माहिती देताना, सुरजेवाला यांनी पायलट यांना पक्षाने अगदी कमी वयात खूप काही दिले होते. याचीही आठवण करून दिली.

जयपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विधीमंडळ पक्षाची बैठक संपल्यानंतर रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, ''आम्हाला एका गोष्टीचे दुःख आहे, की उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदार आणि मंत्री भ्रमित होऊन भाजपाच्या षडयंत्रात अडकले आणि काँग्रेस सरकार पाडण्यासाठी तयार झाले.''

सुरजेवाला म्हणाले, ''सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सचिन पायलट आणि इतर सहकारी मंत्री आणि आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या हाय कमांडने राजेश पायलट यांच्याशी अर्धाडझन वेळा संवाद साधला. सीडब्ल्यूसीच्या दोन सदस्यांनीही अनेक वेळा पायलट यांच्याशी संवाद साधला. केसी वेणुगोपाल यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावतीने आम्हीही त्यांना आवाहन केले, की सर्व दरवाजे खुले आहेत. जर तुमचे काही मतभेत असतील, तर ते काँग्रेस नेतृत्वाला सांगा, आपण बसून ते सोजवू.''

कमी वयात दिल्या मोठ्या जबाबदाऱ्या -सचिन पायलट यांना काँग्रेसने कमी वयात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. ''सचिन पायलट यांना अगदी कमी वयात जी राजकीय ताकद दिली गेली, तेवढी तागद कदाचित कुणालाही दिली गेली नसेल. 2003 मध्ये सचिन पायलट राजकारणात आले. यानंतर 26 वर्षांचे असतानाच 2004 मध्ये त्यांना काँग्रेसने खासदार बनवले. 32 वर्षांचे असताना त्यांना केंद्रात मंत्री करण्यात आले. 34 वर्षांचे असतानाच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची दबाबदारी दिली गेली. 40 व्या वर्षी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव त्यांच्यासोबत होता. यामुळेच त्यांना हे सर्व मिळाले,'' असेही रणदीप सिंह सुरजेवाला यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या -

सचिन पायलटांनी काँग्रेससमोर ठेवल्या 'तीन' मोठ्या मागण्या; जाणून घ्या

CoronaVirus : आता बायोकॉन आणणार कोरोना रुग्णांसाठी औषध, किंमत बघून व्हाल हैराण

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीAshok Gahlotअशोक गहलोत