शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आर.आर. विद्यालयातील शिक्षक, कर्मचार्‍यांचा छळ

By admin | Updated: September 10, 2016 00:49 IST

जळगाव : इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थाध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी यांच्याकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळले आहेत. अपमानास्पद वागणूक देऊन वेठीस धरणे, दादागिरी करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, सेवेतून काढून टाकण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून लाठी यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप शिक्षक व कर्मचार्‍यांनी केला असून त्याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना दिले आहे.

जळगाव : इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर.आर. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थाध्यक्ष अरविंद बंकटलाल लाठी यांच्याकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळले आहेत. अपमानास्पद वागणूक देऊन वेठीस धरणे, दादागिरी करणे, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, सेवेतून काढून टाकण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून लाठी यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप शिक्षक व कर्मचार्‍यांनी केला असून त्याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना दिले आहे.
यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, अरविंद लाठी हे २००१ मध्ये संस्थेत सचिव म्हणून आले. त्यानंतर ते अध्यक्ष झाले. तेव्हापासून त्यांनी संस्थेत दादागिरी व हुकूमशाही सुरू केली. हा प्रकार विद्यालयात आजतागायत सुरू आहे. संस्था नामांकित असल्याने संस्थेची बदनामी होऊ नये, म्हणून सर्वांनी या प्रकाराविषयी तक्रार करणे टाळले. परंतु लाठी यांच्याकडून होणारा त्रास सहनशक्ती पलीकडे गेल्याने शिक्षक व कर्मचार्‍यांनी शेवटी पोलीस अधीक्षकांकडे लेखी स्वरुपात तक्रार केली.
कामात नाहक हस्तक्षेप
शासनाकडून प्राप्त होणार्‍या शासकीय आदेशांचा चुकीचा अर्थ लावून संस्थाध्यक्ष लाठी हे मुख्याध्यापकांवर दबाव आणून शासनाविरोधात पत्रव्यवहार करण्यास भाग पाडतात. शिक्षकांच्या किरकोळ रजा, सहल यासारख्या मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील बाबीतही ते हस्तक्षेप करतात. अशा वेळी एकाच दिवसात चार ते पाच मेमो देऊन शिक्षकांवर दबाव आणला जातो. खोट्या गुन्‘ात अडकवून निलंबित करण्याचीही धमकी देऊन दिली जाते. लाठी यांनी विद्यालयाचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या ताब्यात ठेवले आहेत. एकही बिल त्यांच्या संमतीशिवाय निघत नाही. मुख्याध्यापक नावालाच स‘ा करत असल्याचा आरोप आहे.
सेवाज्येष्ठता डावलली
संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या तत्कालीन प्राचार्या प्रतिभा पाटील यांना आर.आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका करण्यासाठी इतर शिक्षकांची सेवाज्येष्ठता डावलून लाठी यांनी दबाव आणला. सर्वांकडून जबरदस्तीने लिहून घेत त्यांची दोन वर्षांसाठी नियमबा‘ नेमणूक केली. शिक्षक व कर्मचार्‍यांकडून खासगी कामे करून घेणे, कारकुनांचा सतत मानसिक छळ करणे, जातीयवादाच्या भावनेतून मागासवर्गीय शिक्षकांना अपमानीत करणे, ड्रेसकोडची सक्ती करणे, असा त्रास त्यांच्याकडून सुरू आहे.
वेतनवाढ रोखणे, निवडश्रेणी नाकारणे
सेवानिवृत्त पर्यवेक्षक व्ही.ए. जावळे व उप मुख्याध्यापिका व्ही.के. काबरा यांची वेतनवाढ रोखली आहे. काही शिक्षकांनी २४ वर्ष सेवा करूनही त्यांना हेतुपुरस्सरपणे निवडश्रेणी नाकारण्यात आलीआहे.वैद्यकीयबिलांनाहीत्रुटींच्यानावाखालीउशीरकेलाजातो,असेनिवेदनातम्हटलेआहे.