शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता; कोर्टाच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:42 IST

Delhi Liquor Policy Case: मी भ्रष्ट नाही. मी माझ्या प्रामाणिकपणाने जीवन जगतोय. आमच्यावर खोटे आरोप लावले परंतु आज कोर्टात सिद्ध झाले असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून राऊज एवेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या घोटाळ्याच्या आरोपात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, विजय नायर यांच्यासह इतरांवर गंभीर आरोप झाले होते. मात्र या सर्व आरोपातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानं अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले. मोदी-शाह यांनी षडयंत्र रचले आणि आम्हाला भ्रष्टाचारी ठरवले होते असा आरोप केजरीवाल यांनी केला.

कोर्टाने आरोपातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, सत्येचा विजय होतो हे आम्ही कायम म्हणत होतो. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायाधीशांनी आम्हाला न्याय दिला. सत्याचा विजय झाला आहे. आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी मिळून सर्वात मोठे षडयंत्र रचले. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले गेले. विद्यमान मुख्यमंत्र्‍यांना घरातून बाहेर काढत ६ महिने जेलमध्ये ठेवले. उपमुख्यमंत्र्‍यांना २ वर्ष जेलमध्ये ठेवले. हे सगळे खोटे गुन्हे होते. आम्हाला भ्रष्टाचारी ठरवण्यात येत होते असं सांगताना अरविंद केजरीवाल यांच्या डोळ्यात अश्रू आले.

तर मी भ्रष्ट नाही. मी माझ्या प्रामाणिकपणाने जीवन जगतोय. आमच्यावर खोटे आरोप लावले परंतु आज कोर्टात सिद्ध झाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया असो आम आदमी पक्ष हा प्रामाणिक आहे. सत्तेसाठी पंतप्रधानांनी देशाशी खेळू नये. संविधानाशी खेळू नका. तुम्हाला सत्ता हवी तर चांगली कामे करा. आज देशासमोर कित्येक प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी त्याशिवाय देशात रस्त्यांची दुरावस्था आहे. सगळीकडे प्रदुषण आहे. चहुबाजूने देशात वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करून सत्ता मिळवा. केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खोटे आरोप का करता असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, २४ तास राजकारण करणे, खोटे आरोप करून विरोधकांना अडकवणे, त्यांना जेलमध्ये टाकणे हे पंतप्रधानांना शोभत नाही. त्यातून देश पुढे जाणार नाही. देशातील जनतेचे प्रश्न सुटले तर देश पुढे जाईल असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

कोर्टाने काय म्हटलं?

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातून अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोप सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली. या प्रकरणात कुठलेही गुन्हेगारी षडयंत्र दिसत नाही. त्याशिवाय काही ठोस पुरावेही नाहीत. संपूर्ण खटला पाहिला तर त्यात गुन्हेगारी कृत्य झाल्याचे सिद्ध होत नाही. कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय एखाद्याला अडकवणे यावरून न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी सीबीआयला फटकारले. आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत ज्यात पुरावे, साक्षी अपुऱ्या आहेत असंही कोर्टाने म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kejriwal Acquitted in Liquor Scam; Breaks Down After Court Ruling

Web Summary : Arvind Kejriwal acquitted in liquor scam, court cites lack of evidence. He accuses Modi-Shah of conspiracy, claiming false charges. Kejriwal emphasizes truth prevails and criticizes using power for political vendettas. CBI was reprimanded for insufficient evidence.
टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीCourtन्यायालय