शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
3
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
4
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
5
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
6
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
7
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
8
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
9
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
10
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
11
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
12
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
13
Vijay's TVK: अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
14
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
15
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
16
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
17
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
18
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
19
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
20
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
Daily Top 2Weekly Top 5

जगाला हादरवणारा 'तो' हल्ला अन् विवेकानंदांचं भाषण; मोदींनी सांगितला योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 13:57 IST

दहशतवादावर भाष्य करताना मोदींनी सांगितला योगायोग

मथुरा: दहशतवादाची समस्या आता काही देशांपुरती मर्यादीत राहिलेली नाही. देशांच्या सीमा ओलांडून ती जागतिक झाली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. शेजारच्या देशात दहशतवादाची पाळंमुळं रुजली आहेत. या दहशतवादानं जगासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत, असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला लक्ष्य केलं. विविध कार्यक्रमांसाठी मोदी आज मथुरेच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला.आज जगात दहशतवादाची विचारधारा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिला आता देशाच्या सीमा उरलेल्या नाहीत. दहशतवाद जागतिक समस्या असल्यानं सर्वच देशांनी एकत्र येऊन तिचा सामना करायला हवा, असं आवाहन मोदींनी केलं. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही ते अनेकदा दाखवून दिलं आहे. दहशतवादाविरोधातील लढाई यापुढेही सुरुच राहील. आमच्या सरकारनं दहशतवाद्यांविरोधात कठोर कायदे केले आहेत, असं म्हणत मोदींनी यूएपीएचा संदर्भ दिला. दहशतवादावर बोलताना पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेतलं गाजलेलं भाषण आणि 9/11 हल्ला या दोन घटनांमधील योगायोग सांगितला. 'शतकभरापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये शांततेवर ऐतिहासिक भाषण दिलं. काही वर्षांनंतर नेमका त्याच दिवशी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. त्या हल्ल्यानं संपूर्ण जग हादरलं. विवेकानंदांनी ज्या दिवशी शांततेच्या मुद्द्यावर भाषण करुन लोकांची मनं जिंकली, त्याच दिवशी काही वर्षांनी दहशतवादी हल्ला होणं हा अतिशय दुर्दैवी योगायोग आहे,' असं मोदी पुढे म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद