शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणार

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणार

विधी १८-वांद्रे-वरळी सी लिंकवरील आत्महत्या टाळण्यासाठी कठड्याची उंची वाढवणार
नागपूर- वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता या सी लिंकच्या कठड्याची उंची पाच फूट वाढविण्यात येणार असून त्यावर जाळी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेला लेखी उत्तरात दिली आहे.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या सी लिंकवरून आतापर्यंत नऊ लोकांनी उडी मारून आत्महत्या केली असल्याने सरकार कोणत्या उपाययोजना करणार, असा सवाल कवाडे यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी म्हटले आहे की, जानेवारी ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत या सी लिंकवरून दोन व्यक्तींनी उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्या रोखण्याकरिता परिमंडळ-तीनच्या उपायुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला पत्र लिहून सी लिंकच्या दोन्ही मार्गीकेवर दिवसा व रात्री नजरेस पडतील असे नो पार्किंगचे फलक लावणे, दोन्ही मार्गिकेवर सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा उपाययोजना सुचवल्या आहेत. सध्या सी लिंकवर सुरक्षा रक्षक नेमले असून त्यांना संपर्काकरिता वॉकीटॉकी दिलेले आहेत. याखेरीज पर्यावरण खात्याच्या परवानगीने कठड्याची उंची पाच फूटाने वाढवणे आणि जाळी बसवणे हेही उपाय करण्यात येणार आहेत. वरळी पोलीस ठाण्याची बिनतारी गस्ती वाहनाची गस्त सी लिंकवर ठेवलेली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
.....................................................................
अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत ५ ते ७ टक्के कमी होणार-मेहता
म्हाडाच्या सुधारित ठरावानुसार सदनिकांचे ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर सुधारित विक्री किंमत काढण्यात येणार असल्याने अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांची किंमत ५ ते ७ टक्के इतकी कमी होणे अपेक्षित आहे, असा दावा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी विधान परिषदेला दिलेल्या लेखी उत्तरात केला.
विजय सावंत यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. अल्प व अत्यल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांची किंमत १५ लाखांपेक्षा अधिक असल्याने त्या या गटातील लोकांना परवडत नसल्याची तक्रार असल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणले होते. त्यावर जानेवारी २०१४ मध्ये ८१४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात दिली होती. त्यामध्ये २९७ अत्यल्प उत्पन्न गटाच्या तर २०७ अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांचा समावेश होता, असे मेहता यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)