शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

घाऊक महागाई दरात वाढ; जानेवारीत ३.१ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:18 IST

कांदे-बटाटे आदींच्या किमती वाढल्याचा परिणाम; उद्दिष्टांची मर्यादा ओलांडली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर जानेवारीमध्ये वाढून ३.१ टक्के झाला. आदल्या महिन्यात तो २.५९ टक्के होता. कांदा आणि बटाटे यासारख्या खाद्यवस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईच्या दरात वाढ झाली आहे.गेल्या वर्षी या अवधीत मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाईचा दर २.७६ टक्के होता. खाद्यवस्तूंपैकी भाजीपाल्याचे दर सर्वाधिक ५२.७२ टक्क्यांनी वाढले. कांद्यातील अतितीव्र दरवाढ याला कारणीभूत ठरली. कांद्याचे दर तब्बल २९३ टक्क्यांनी वाढले. तर बटाट्याचे दर ३७.३४ टक्क्यांनी वाढले. या आठवड्याच्या सुरुवातीला ग्राहक वस्तू निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाईची आकडेवारी सरकारने जाहीर केली. जानेवारीत सीपीआय वाढून ७.५९ टक्के झाला. हा सहा वर्षांचा उच्चांक असून, रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेल्या महागाई उद्दिष्टाची मर्यादा ओलांडली गेली आहे. भाजीपाला आणि खाद्यवस्तूंच्या दरवाढीमुळे सीपीआय निर्देशांक वाढला आहे. महागाईचा हा मे २0१४ नंतरचा उच्चांक ठरला आहे. मे २0१४ मध्ये हा दर ८.३३ टक्क्यांवर होता.गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने दुमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यात धोरणात्मक व्याजदर ५.१५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेबाबतचा दृष्टिकोनही रिझर्व्ह बँकेने समावेशी (अ‍ॅकॉमॉडेटिव्ह) असा कायम ठेवला आहे.सर्वच वस्तू महागवाणिज्य व उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जानेवारीत खाद्यवस्तूंच्या महागाईचा दर ११.५१ टक्के राहिला. आदल्या महिन्यात तो २.४१ टक्के होता. खाद्य वस्तू वगळता अन्य पदार्थ व उत्पादने यांचा महागाईचा दर जवळपास तिपटीने वाढून ७.८ टक्के झाला. डिसेंबरमध्ये तो २.३२ टक्के होता.

टॅग्स :Inflationमहागाई