शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

पत्रा फाडून जखमींना काढले बाहेर

By admin | Updated: July 18, 2016 23:32 IST

हा अपघात झाला; तेव्हा पाऊस सुरू होता. दुसरीकडे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. सुरुवातीला रुग्णवाहिका थेट घटनास्थळापर्यंत जातील, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका अपघाग्रस्त बसेस्जवळ आल्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. काही जखमी प्रवासी बसचा पत्रा तसेच आसनांमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढता येत नव्हते. वयोवृद्ध प्रवाशांना मार लागल्याने भोवळ आली होती. पत्रा व आसने ओढता येत नसल्याने जखमींना बाहेर काढता येत नव्हते. म्हणून ग्रामस्थांनी दोर ट्रॅक्टरला बांधून पत्रा व आसने ओढून जागा मोकळी केली. त्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. दोन्ही बसेसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना जळगावला हलविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या तब्बल ४ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

हा अपघात झाला; तेव्हा पाऊस सुरू होता. दुसरीकडे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने मदतकार्यात अडथळे आले. सुरुवातीला रुग्णवाहिका थेट घटनास्थळापर्यंत जातील, यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली. रुग्णवाहिका अपघाग्रस्त बसेस्जवळ आल्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. काही जखमी प्रवासी बसचा पत्रा तसेच आसनांमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढता येत नव्हते. वयोवृद्ध प्रवाशांना मार लागल्याने भोवळ आली होती. पत्रा व आसने ओढता येत नसल्याने जखमींना बाहेर काढता येत नव्हते. म्हणून ग्रामस्थांनी दोर ट्रॅक्टरला बांधून पत्रा व आसने ओढून जागा मोकळी केली. त्यानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. दोन्ही बसेसमधील २५ प्रवासी जखमी झाल्याने त्यांना जळगावला हलविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या तब्बल ४ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
शर्थीने केली वाहतूक सुरळीत
अपघातानंतर सर्वात आधी वाहतूक सुरळीत करणे आवश्यक असल्याने प्रयत्न केले जात होते. परंतु दोन्ही बसेस रस्त्याच्या मधोमध असल्याने अडचणी येत होत्या. बसेस हलविण्यासाठी जळगावातून क्रेन मागविण्यात आले. परंतु क्रेन येण्याआधीच वावडदा येथील रवी कापडणे यांनी त्यांच्या मालकीचे जेसीबी मशीन आणून दोन्ही बसेस रस्त्यावरून बाजूला हटविल्या. एक बस रस्त्याच्या बाजूला करण्यात आली तर दुसरी बस अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत ओढून सोडण्यात आली. त्यानंतर जिल्हा वाहतूक शाखा, एमआयडीसी पोलीस ठाणे, मुख्यालयातील पोलीस कर्मचार्‍यांनी शर्थीने प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली.
अधिकार्‍यांचा ताफा घटनास्थळी दाखल
या अपघाताची माहिती झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, एस.टी. महामंडळाच्या जळगाव विभागाच्या नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेची पाहणी करून माहिती जाणून घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल बाळू पाटील, जितेंद्र राठोड, सचिन मुंडे, जितेंद्र राजपूत, सुशील मगरे, प्रकाश पवार, समाधान पाटील, विजय नेरकर यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रवी कापडणे, विलास गोपाळ, अर्जून राजपूत, जाकीर खाटीक, राहुल पवार, श्रीकृष्ण पाटील, प्रमोद चव्हाण, पिंटू मराठे, सुमीत पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पोलिसांना मदतकार्यात सहकार्य केले. सुरुवातीला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी येण्यास विलंब होत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी त्यांच्या वाहनांच्या साहाय्याने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यास सुरुवात केली होती. अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड आरडाओरड व रडारड सुरू होती.