शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात बेचैनी!

By admin | Updated: January 13, 2015 12:15 IST

कसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्येही केवळ मोदींच्या नावे मते मागणा-या भाजपासाठी हा मोठा धक्का आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली बहुप्रतीक्षित दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या आदल्या रात्री लागलेल्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणूक निकालात भाजपाला नरेंद्र मोदींच्या वाराणशीसह अनेक ठिकाणी पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्येही केवळ मोदींच्या नावे मते मागणा-या भाजपासाठी हा मोठा धक्का आहे. स्वत: पंतप्रधान मोदी प्रतिनिधित्व करीत असलेल्या वाराणशीत कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सातही जागा गमावल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीलाटेचा भर ओसरू लागल्याच्या जाणिवेने भाजपात बेचैनी आली आहे, तर काँग्रेसच्या आशेत भर पडली आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनौमध्येही भाजपाने कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सर्व जागा अपक्षांपुढे गमावल्याने भाजपाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या मे महिन्यात लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७३ जागा जिंकल्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सपशेल आपटी खावी लागल्याने भाजपाला चिंता वाटू लागली आहे. भाजपासाठी त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणजे दस्तुरखुद्द दिल्लीतील कॅन्टोनमेंटच्या पूर्वी जिंकलेल्या पाचही जागा पक्षाने राखल्या आहेत. पण दिल्लीतच ज्या विद्यमान अपक्ष सदस्याला पक्षात घेऊन भाजपाने तिकीट दिले, तोही पराभूत झाला आहे. > विधानसभेसाठी ७ फेब्रुवारीला मतदानदिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी एकाच टप्प्यात येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होणार असून, १० फेबु्रवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल.मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़ एस़ संपत यांनी आज सोमवारी एका पत्रपरिषदेत दिल्ली विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला़ याचसोबत दिल्लीत तत्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झाली़