शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

Lakhimpur Kheri Violence: अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको, लखीमपूरप्रकरणी शेतकरी आंदोलकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 9:10 AM

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविण्यात न आल्यास येत्या सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी शेतकरी देशभरात रेल रोको आंदोलन करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.

आग्रा : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविण्यात न आल्यास येत्या सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी शेतकरी देशभरात रेल रोको आंदोलन करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष व आणखी काही जणांना अटक केली आहे. मात्र या कारवाईवर शेतकरी आंदोलक समाधानी नाहीत. लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत अजय मिश्रा यांनाही जबाबदार धरून त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री या पदावरून हटवावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. मात्र तसा निर्णय केंद्र सरकारने न घेतल्यास शेतकरी १८ ऑक्टोबर रोजी देशव्यापी रेल रोको आंदोलन करतील. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाने सांगितले की, येत्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येईल. आंदोलनादरम्यान रेल्वेगाड्यांची वाहतूक रोखून धरण्यात येईल, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अलिगढ येथे सांगितले. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले,  हा हिंसाचार घडविण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी कोणती भूमिका निभावली याची चौकशी झाली पाहिजे. त्याआधी त्यांना केंद्र सरकारने मंत्रीपदावरून हटवावे. मात्र त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेले नाही किंवा अजय मिश्रांकडून मंत्रीपदाचा राजीनामाही केंद्राने घेतलेला नाही.

मंत्र्याला पाठीशी का घालता?-  लखीमपूर खेरी येथे हिंसाचार झाला त्याप्रसंगी घटनास्थळी आपण उपस्थित नव्हतो, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याने केला होता. मात्र त्याचे पुरावे तो पोलिसांना देऊ शकलेला नाही. - जय मिश्रा यांनाही मोदी सरकार पाठीशी का घालत आहे, असा सवाल शेतकरी आंदोलक विचारत आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलन