दमदार पावसाने नागरिकांना दिलासा

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30

अकलूज : पावसाळ्याच्या सरतेला अकलूज व परिसरात आज पहाटे व दुपारी दमदार पावसाच्या हजेरीने परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज वरुणराजाने कृपा केल्याने सर्वसामान्य शेतकरी सुखावला आहे.

Relief for the residents by a strong rain | दमदार पावसाने नागरिकांना दिलासा

दमदार पावसाने नागरिकांना दिलासा

लूज : पावसाळ्याच्या सरतेला अकलूज व परिसरात आज पहाटे व दुपारी दमदार पावसाच्या हजेरीने परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज वरुणराजाने कृपा केल्याने सर्वसामान्य शेतकरी सुखावला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसानंतर वरुणराजाने दडी मारली होती. जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने माळशिरस तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रo्न निर्माण झाला होता.
दिवसेंदिवस बळीराजासह सर्वसामान्य नागरिक पावसाची प्रतीक्षा करीत होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत उष्णता निर्माण झाल्याने उकाडा वाढला होता. त्यात वीजकपातीमुळे नागरिक हैराण झाले असताना आज पहाटे 5 ते 6 व सकाळी 10 ते 12 वा. या तीन तासात वरुणराजाने अकलूज परिसरात बरसात केल्याने परिसरातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. आजच्या पावसाने जनावरांना चरण्यासाठी गवताचा चारा उपलब्ध होणार आहे.

Web Title: Relief for the residents by a strong rain