शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, कोल्हापूरच्या पूर संकटाला दिलासा; कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार

By अशोक डोंबाळे | Updated: January 30, 2026 13:48 IST

अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा नाकारला

अशोक डोंबाळे

सांगली : कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नव्हे तर दुरुस्तीला परवानगी दिली आहे, असा खुलासा केंद्रीय जल आयोगाने केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकातील अलमट्टी धरणाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यास आणि त्याची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे.

सांगलीतील ॲड. विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का? आणि उंची वाढविण्यास मंजुरी दिली आहे का? अशी विचारणा केली होती. केंद्रीय जल आयोगाने ॲड. कदम यांना २६ जानेवारी २०२६ रोजी लेखी पत्रव्यवहार करून खुलासा केला आहे.

यामध्ये म्हटले की, केंद्र शासनाने २००८ मध्ये १६ प्रकल्पांना राष्ट्रीय दर्जा दिला. यामध्ये अलमट्टी धरणाचा समावेश नाही. अलमट्टी धरणाला या योजनेंतर्गत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करावी लागतील. यात गुंतवणूक मंजुरी, निधी उपलब्धता आणि सरकारी प्राधान्यक्रम यांचा समावेश आहे. कर्नाटक सरकारने केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाकडे असा कोणताही प्रस्ताव दिला नाही.

दुसरीकडे, धरणाची उंची, साठवण क्षमता किंवा संबंधित कामांमध्ये वाढ करण्यासही केंद्रीय जल आयोगाने पूर्णपणे नकार दिला आहे. धरणांच्या सुरक्षिततेसाठी राबवल्या जाणाऱ्या धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कर्नाटक राज्य सहभागी आहे. या टप्प्यात कर्नाटक जलसंपदा विभागाने १८ धरणांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव दिला असून यामध्ये अलमट्टी धरणाचा समावेश आहे. मात्र, या मंजूर प्रस्तावात धरणाची उंची वाढवण्याशी संबंधित कोणतेही काम प्रस्तावित नाही. हे पुनर्वसन केवळ भौतिक सुधारणांसाठी आहे, जसे की सुरक्षितता वाढवणे आणि कार्य प्रदर्शन सुधारणे.

अप्पर कृष्णा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याबाबत ही सीडब्ल्यूसीने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल १६ मार्च २०२१ रोजी प्राप्त झाला, ज्यात अलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.२६ मीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे अतिरिक्त १३० टीएमसी पाण्याचा साठा आणि वापर शक्य होईल, असा दावा आहे. मात्र, कृष्णा जल वाटप लवादाच्या दुसऱ्या निर्णय (केडब्ल्यूडीटी-२) अद्याप प्रभावी नसल्याने, हा प्रस्ताव आंतरराज्यीय दृष्टिकोनातून अस्वीकार्य आहे, असे सीडब्ल्यूसीच्या आंतरराज्यीय बाबी संचालनालयाने १८ मे २०२१ रोजीच्या पत्रात नमूद केले आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढणार नाही : विश्राम कदम

सीडब्ल्यूसीचे संचालक अनंत कुमार गुप्ता यांनी हे उत्तर मुख्य अभियंत्याच्या मान्यतेने २६ जानेवारी २०२६ रोजी दिले आहे. यामध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यात येणार नाही. केवळ धरणाच्या दुरुस्तीला जल आयोगाने परवानगी दिली आहे. तसेच धरणाला राष्ट्रीय दर्जाही दिलेला नाही, असेही उत्तर दिले आहे, अशी माहिती ॲड. विश्राम कदम यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief: Central Water Commission Rejects Almatti Dam Height Increase

Web Summary : Central Water Commission denied national project status and height increase for Almatti Dam, benefiting flood-affected Sangli, Kolhapur. Only repairs approved. Krishna Water Disputes Tribunal-2 decision pending.