रिलायन्स जियोकडे पहिल्याच महिन्यात दीड कोटी ग्राहक

By Admin | Updated: October 9, 2016 21:24 IST2016-10-09T21:24:14+5:302016-10-09T21:24:14+5:30

दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच महिन्यात या कंपनीने एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत.

Reliance Jiochadi launched 1.5 crore subscribers in the first month | रिलायन्स जियोकडे पहिल्याच महिन्यात दीड कोटी ग्राहक

रिलायन्स जियोकडे पहिल्याच महिन्यात दीड कोटी ग्राहक

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - दूरसंचार कंपनी रिलायन्स जियोने नवे रेकॉर्ड केले असून, एकाच महिन्यात या कंपनीने एक कोटी साठ लाख ग्राहक जोडले आहेत. हे जागतिक रेकॉर्ड असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एवढ्या गतीने ग्राहक जोडण्यात कंपनीने फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपलाही मागे टाकले असल्याचे म्हटले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स जियोने ४ जी सेवेने ही नवी योजना ५ सप्टेंबर रोजी सुरू केली. पहिल्या २६ दिवसांतच कंपनीने नवे एक कोटी ६० लाख ग्राहक जोडले आहेत. याबाबत मुकेश अंबानी यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, आमच्या योजनांचा नागरिक पूर्णपणे वापर करत आहेत.

डेटाच्या ताकदीतून प्रत्येक भारतीयाला सशक्त बनविणे हा जियोचा उद्देश आहे. जियोची सद्या वेलकम आॅफर सुरु असून डिसेंबरपर्यंत ती पूर्ण नि: शुल्क आहे. तर, आयफोनच्या नव्या ग्राहकांसाठी एक वर्षांपर्यंत सेवा नि:शुल्क देण्यात येणार आहे. कंपनीने आगामी काळात दहा कोटी ग्राहकांचे लक्ष्य ठेवले आहे.

Web Title: Reliance Jiochadi launched 1.5 crore subscribers in the first month