शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

नियमानुसार पुनर्वसन करा

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

फोटो - रॅप

फोटो - रॅप
विक्तुबाबा नगरवासीयांची मागणी : नगरवासी १५ दिवसांपासून धरण्यावर
नागपूर : मिहान प्रकल्पांतर्गत जमिनीचे संपादन करतांना सर्वांना समान न्याय द्या, पुनर्वसनाच्या नियमानुसार मोबदला द्यावा, या मागणीसाठी विक्तुबाबा नगरातील मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे. विक्तुबाबा नगरवासीयांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात केवळ १००० चौरस फूट जमीन एवढाच मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
गेल्या ४० वर्षापासून विक्तुबाबानगर वसलेले आहे. येथे २१० घर असून, हजारावर लोकसंख्या आहे. या नगराचा मिहान प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांच्या घराच्या मोबदल्यात केवळ १००० चौरस फूट विकसित जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय येथील रहिवाशांना मान्य नाही. आम्हाला १५०० चौरस फूट जागा द्यावी, १० लाख रुपये मोबदला द्यावा, एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी येथील नगरवासीयांची आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन, आपल्या मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या आहे. जोपर्यंत पुनर्वसनाच्या नियमानुसार मोबदला मिळत नाही, तोपर्यंत जमिनी संपादित होऊ देणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.
::::चौकट:::
समाधानकारक पुनर्वसन व्हावे
सरकार आमच्या जमिनी घेऊन त्याचा व्यावसायिक उपयोग करीत आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन नियमानुसार होणे गरजेचे आहे. सरकार ही जमीन अतिक्रमण असल्याचे सांगत आहे. मात्र हे नगर ४० वर्षापासून वसलेले आहे. त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. सरकारने पुनर्वसन कायद्यांतर्गत याला स्लम घोषित करून, त्याअंतर्गत मिळणारा लाभ द्यावा.
नटराज पिल्ले, सचिव, मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समिती