शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय अधिकाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

हायकोर्टाने फटकारले : सार्वजनिक रस्त्यावर बांधली भिंत

हायकोर्टाने फटकारले : सार्वजनिक रस्त्यावर बांधली भिंत

नागपूर : शासकीय अधिकाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करून सार्वजनिक रस्त्यावर भिंत बांधली. यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. परिणामी अवैध भिंत ४८ तासांत पाडण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी हायकोर्टाला दिली आहे.
हे प्रकरण ब्रह्मपुरी येथील आहे. अवैध भिंतीमुळे नेवजाबाई हितकारणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला होता. यामुळे शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ७५ वर्षे जुन्या या शाळेत १६०० वर विद्यार्थी व १०० वर कर्मचारी आहेत. शाळेत जाण्यासाठी १५ फुटाचा रस्ता असून खासदार निधीतून डांबरीकरण झाले आहे. या रस्त्याचा विकास आराखड्यात समावेश आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शासकीय वसतीगृहाच्या जागेतून हा रस्ता जातो. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-विभागीय अभियंता व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी मुलींच्या सुरक्षेचे कारण पुढे करत सीमा भिंत बांधून रस्ता बंद केला. गेल्या २२ जानेवारी रोजी नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून भिंत अवैध असल्याचे व त्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे कळविले. यानंतरही भिंत हटविण्यात आली नाही.
उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता अधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले. यानंतर सरकारी वकील भारती डांगरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ४८ तासांत भिंत पाडण्याची ग्वाही दिली. न्यायालयाने हे बयाण आदेशात नोंदवून भिंत न पाडल्यास पोलीस अधीक्षकांना रस्ता मोकळा करण्याचे व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देऊ असे स्पष्ट केले आहे. पुढील सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. मोहित खजांची, तर नगर परिषदेतर्फे ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.