शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्रेडला लाल सलाम आदर्श नेता गमावला : मान्यवरांनी व्यक्त केली शोकसंवेदना

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

नागपूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांची उणीव देशाला सदैव जाणवेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

नागपूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांची उणीव देशाला सदैव जाणवेल, अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केली.

नागपूरच्या भूषणाला गमावले
- ए. बी. बर्धन यांच्या निधनामुळे कम्युनिस्ट पक्षाची मोठी हानी झाली. या पक्षाच्या मोठ्या पदापर्यंत पोहोचून त्यांनी नागपूरचे वैभव वाढविले. देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या उपराजधानीचा गौरव वाढविला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकाणाची भरून न निघणारी हानी झाली आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे,
पालकमंत्री, नागपूर जिल्हा

नागपूरचे मोठे नुकसान
कॉम्रेड बर्धन हे राजकारणातील मोठे प्रस्थ होेते. नागपूरच नव्हे तर देशभरात त्यांना मान होता. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी सोडली असती तर ते मोठ्या पदावर राहिले असते. परंतु त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. कामगारांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांची विचारसरणी वेगळी असली तरी ते महात्मा गांधी यांच्यासारखे जीवन जगले. त्यांच्या निधनाने पक्षासोबतच नागपूरचे मोठे नुकसान झाले.
- गेव्ह आवारी,
माजी खासदार

कामगार चळवळ पोरकी झाली
- बर्धन यांच्या निधनाने कामगार चळवळ पोरकी झाली आहे. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार चळवळीला समर्पित केले होते. ते केवळ राजकीय पुढारीच नव्हते तर एक उत्तम सामाजिक कार्यकर्तेही होते. माझे आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या रूपात मी एक व्यक्तिगत मित्रही गमावला आहे.
- दत्ता मेघे, माजी खासदार

संघर्षशील नेत्याला देश मुकला
- कामगारांसाठी आयुष्यभर झटणारे कॉ. ए.बी. बर्धन यांच्या निधनाने देश एका कर्मनिष्ठ, संघर्षशील नेत्याला मुकला आहे. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांच्या निधनाने नागपूरसह देशाचे मोठे नुकसान झाले आहे. मी माझ्यातर्फे व भाजपातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
- खा. अजय संचेती

कम्युनिस्ट चळवळीची हानी
-एक सामान्य जीवन जगणारा नेता म्हणून कॉम्रेड बर्धन ओळखले जात. त्यांनी त्यांच्या कार्याने नागपूरचे नाव संपूर्ण जगात पोहोचविले. त्यांच्या अचानक जाण्याने कम्युनिस्ट चळवळीची मोठी हानी झाली. ती पोकळी भरून निघणे अशक्य आहे.
- कृपाल तुमाने,
खासदार, रामटेक