शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेतील अल्पमतामुळे रालोआ चिंतित!

By admin | Updated: July 1, 2014 02:25 IST

येत्या 7 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना, राज्यसभेतील अल्पमतामुळे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) चिंता वाढल्या आहेत़

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
येत्या 7 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना, राज्यसभेतील अल्पमतामुळे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) चिंता वाढल्या आहेत़ 245 सदस्यांच्या राज्यसभेत रालोआचे जेमतेम 57 खासदार आहेत़ अशास्थितीत मनाप्रमाणो कामकाज उरकून घेणो रालोआ नेतृत्वाला कठीण जाऊ शकत़े
भाजपा, तेदेपा, शिवसेना, अकाली दल, आरपीआय (आ.) आणि एनपीएफ या पक्षांची मोट असलेल्या रालोआकडे राज्यसभेत सर्व मिळून 57 खासदार आहेत़ इंडियन नॅशनल लोकदलाचे दोन खासदार आणि काही अपक्ष आणि एक खासदार असलेले सुमारे डझनभर लहानसहान पक्षांच्या पाठिंब्याने हा आकडा जास्तीतजास्त 65 वर जाऊ शकतो़ पण राज्यसभेतील कामकाज सुरळीतपणो चालविण्यासाठी भाजपाला 122 खासदारांचा जादुई आकडा गाठण्याची गरज आह़े अलीकडे झालेल्या राज्यसभा निवडणुकीनेही रालोआच्या संख्याबळात काहीही भर पडलेली नाही़ राज्यसभेत पूर्ण बहुमतासाठी रालोआला आणखी किमान चार वर्षे लागतील. 2क्14 आणि 2क्15 मधील विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमत मिळाले तरच चार वर्षात राज्यसभेत बहुमत मिळवणो शक्य होईल. तूर्तास तरी राज्यसभेचे नेते असलेले केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि संसदीय कामकाज मंत्री एम़ वेंकय्या नायडू यांना सरकारी कामकाज उरकून घेण्यात अनेक अडचणींचा  सामना करावा लागणार आह़े
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्तिगतरीत्या अण्णाद्रमुक प्रमुख जयललिता यांच्या संपर्कात आहेत. कायदा व दूरसंचार मंत्री रवी शंकर हेही जयललितांच्या नियमित संपर्कात असल्याचे कळत़े एरवी सार्वजनिकरीत्या मोदींविरोधी भूमिका घेणो भाग असलेल्या बसपाप्रमुख मायावती या  वरिष्ठ सभागृहात मोदी सरकारच्या मदतीला धावून जाऊ  शकतात़  तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी तसेच बीजद प्रमुख नवीन पटनायक हे दोघेही मोदींच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता मात्र दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर  राज्यसभेत आपली महत्त्वपूर्ण विधेयके मार्गी लावणो रालोआला कठीण दिसते. काँग्रेसने विधेयकांना विरोध केल्यास सरकार संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवेल, हे आधीच मोदी सरकारने सांगून टाकले आह़े पण कदािचत तशी वेळच येणार नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आह़े
 
4राज्यसभेत काँग्रेसचे 68 खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे दोन आणि अन्य काही मित्र पक्ष असे मिळून यूपीएचा हा आकडा 75 च्या घरात जातो़ डाव्या पक्षांचे 11, जनता दला(युनायटेड)चे 12 आणि समाजवादी पक्षाचे 1क् हे पक्ष वेळ आल्यास मोदी सरकारला विरोध या सामायिक कारणासाठी काँग्रेसच्या बाजूने उभे राहू शकतात़ पण ख:या अर्थाने बहुजन समाज पार्टी (14 खासदार), तृणमूल काँग्रेस (12 खासदार), अण्णाद्रमुक (11 खासदार), बीजू जनता दल (7 खासदार) हे पक्ष राज्यसभेत निर्णायक भूमिकेत राहणार आहेत़