शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती भवनाचा मार्ग भाजपासाठी खडतर?

By admin | Updated: October 11, 2016 06:11 IST

राष्ट्रपतीपदावर हिंदुत्ववादी राजकीय व्यक्तीची वर्णी लावून इतिहास घडविण्याचा भाजपाचा मनसुबा असला, तरी भाजपा, संघ परिवारासाठी राष्ट्रपती भवनाची वाट खडतरच

हरीश गुप्ता / नवी दिल्ली राष्ट्रपतीपदावर हिंदुत्ववादी राजकीय व्यक्तीची वर्णी लावून इतिहास घडविण्याचा भाजपाचा मनसुबा असला, तरी भाजपा, संघ परिवारासाठी राष्ट्रपती भवनाची वाट खडतरच दिसत आहे. लोकसभेत संपूर्ण, तर राज्यसभेत कामचलाऊ बहुमत साध्य करणाऱ्या भाजपाची १४ राज्यांत सत्ता आहे. असे असले, तरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक बहुमताच्या दृष्टीने भाजपाचे पारडे पुरेसे जड नाही. त्यामुळे २०१७ मधील राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण जिंकणार? याची कोणीही ठाम खात्री देऊ शकत नाही.

जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रणव मुखर्जी हे ल्युटन्स परिसरातील ३४ नंबरच्या बंगल्यात मुक्कामाला जाण्याची शक्यता आहे.. राष्ट्रपतीपदी त्यांची दुसऱ्यांदा वर्णी लागेल का, हे सांगणे घाईचे ठरेल. राज्यसभा व लोकसभा तसेच राज्यांतील विधानसभा सदस्यांच्या मतांचे मूल्य १०.९८ लाख असून, राष्ट्रपतीपदी निवडून येणाऱ्या उमेदवारास ५.४९ मूल्यांची लाख मते मिळविणे जरूरी असते; परंतु भाजपला २ टक्के मते कमी पडतात. त्यामुळे हा आकडा गाठण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेशात होणारी विधानसभेची आगामी निवडणूक जिंकावी लागेल. संसदेतील एकूण ७७५ खासदारांपैकी भाजप आणि मित्रपक्षाला ४५० खासदारांचा पाठिंबा आहे. त्यानसुार भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला ३,१७,८९२ मते मिळू शकतील. तथापि, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ यासारख्या मोठ्या राज्यांत भाजपचा फारसा जम नाही. एकूण ५.९८ लाख मतांपैकी उपरोक्त राज्यांतील मतांचा आकडा जवळपास ३ लाख आहे. त्यामुळे पारडे जड करण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता कसोशीने प्रयत्न करावे लागतील. उत्तर प्रदेशमार्गे राष्ट्रपती भवनाचा मार्ग जातो. त्या राज्याकडे ८३ हजार मते आहेत. बिहार पराभवाने भाजपला हादराच बसला आहे. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्ष वगळून काँग्रेसचे संयुक्त उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसने उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांचे नाव पुढे केले आहे, असे कळते.लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, करिया मुंडा, सुमित्रा महाजन, नजमा हेपतुल्ला यांच्यासह भाजपचे इतर नेते राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असले तरी या नेत्यांच्या विजयाची खात्री होईपर्यंत पंतप्रधान एकाही नेत्याला मैदानात उतरविण्याची जोखीम घेणार नाहीत. ते एकमताने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवतील. शिवाय उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करतील