शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक... चोरी

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

रामटेक परिसरात चोरीचे सत्र सुरूच

रामटेक परिसरात चोरीचे सत्र सुरूच
पोलिसांचे दुर्लक्ष : नागरिकांत भीतीचे वातावरण
रामटेक : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. अशा गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे, अशात बाहेरगावी गेल्यास घरी हमखास चोरी होत असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरासह परिसरातील शीतलवाडी, गुरूकुलनगर व इतर वस्त्यांमध्ये नागरिक चोरट्यांच्या दशतीत असून याकडे रामटेक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक रहिवासी दयानंद रेवतकर यांच्याकडे तीनदा घरफोडी झाली. तसेच त्यांच्या सिमेंट फॅक्टरी आवारातून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शीतलवाडी येथील व्यवसायी प्रकाश कळमकर यांच्या घरी चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून ५ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. तसेच वैशालीनगरातील लता पाठक यांच्याकडील दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर शहरातील नवीन वसाहतीमध्ये दर आठवड्याला चोरीच्या घटना होत आहेत. मोटरसायकल चोरी, आठवडी बाजारात मंगळसूत्र चोरी, शेतातील कृषीपंपाची चोरी आदी घटनांमुळे नागरिक दहशतीत जगत आहेत.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या रामटेक शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. तालुक्यातील खेड्यापाड्यातील महिला व ग्रामस्थ बाजारासाठी येतात. बाजारातील ग्राहकांमध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या मजुरांवर बाजारात खिसेकापू डाव साधतात. येथील आठवडी बाजारात खिसेकापूचे प्रमाण अधिक असते. या घटनांकडे पोलीस कानाडोळा करीत असल्याने चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच मोबाईल चोरीचेही प्रमाण वाढत आहे.